Header Ads Widget

जीवनदान ग्रुप ब्लड नेटवर्क संस्थेचा सत्कार


जीवनदान ग्रुप ब्लड नेटवर्क संस्थेचा सत्कार

प्रतिनिधी

रत्नागिरी - जीवनदान ग्रुप ब्लड नेटवर्क, नाचणे, रत्नागिरी ही सामाजिक संस्था गेली ८ वर्षे रक्तदान या महत्त्वाच्या विषयांवर काम करीत आहे. या संस्थेने गेल्या ८ वर्षांत ७९ रक्तदान शिबिरे राबवून सामाजिक क्षेत्रात उत्तम काम केले आहे. याबद्दल रत्नागिरी जिल्हा शासकीय रक्तपेढीकडून १४ जून जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून जीवनदान ग्रुप ब्लड नेटवर्क या संस्थेला सिव्हिल सर्जन डाॕ. जगताप, डाॕ.कुमरे, डाॕ. सुतार,  पावरा, रामपूरकर मॕडम यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. जीवनदान ग्रुपकडून सन्मानीय महिला सदस्या आश्विनी पाटील, पौर्णिमा पवार, निधी चव्हाण, शिल्पा नार्वेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.


जाहिरात - अभिज्ञान अकादमी


Post a Comment

0 Comments