Header Ads Widget

rajapur : राजापुरात होणार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, राजापूरवासीयांना दिलासा


वाटूळ राजापूर येथे होणार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल; 

मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची मंजुरी

पालकमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार तर किरण सामंत यांचा पाठपुरावा

रत्नागिरी - राजापूर तालुक्यातील वाटूळमध्ये मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल होणार असून संपूर्ण राजापूरवासीयांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी वाटूळ येथे महामार्गाशेजारी होणाऱ्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला मंजुरी दिली आहे. 

पाईल्सवर रामबाण उपाय

राजापूर तालुक्यात मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात यावे, ही गेल्या अनेक वर्षांपासूनची राजापूरवासीयांची मागणी होती. एखादी काही घटना घडल्यास त्या व्यक्तीला रत्नागिरीतील सिव्हिल रुग्णालय किंंवा मग थेट मुंबई गाठावी लागत होती. मात्र आता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल लवकरात लवकर उभारल्यास राजापूरवासीयांना मोठा फायदा होईल, अशा भावना राजापूरवासीयांनी व्यक्त  केल्या आहेत.

ओमेगा ऑईल

रत्नागिरीचे जिल्ह्याचे पालकलमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वाटूळ येथे उभारण्यात येणाऱ्या संभाव्य मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी ८ दिवसांपूर्वी पाहणी केली होती. तर हॉस्पिटल उभारणीच्या प्रस्तावाचा किरण सामंत यांनी पाठपुरावा केला होता. या हॉस्पिटलला 25 एकर जागा लागणार आहे त्यापैकी 5 एकर जागा सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी देण्याचा निर्णय घेतला होता. 

स्टॅमिना वाढवा

सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त रंगा नायक यांच्याकडे सध्या हा प्रस्ताव प्रलंबित होता. त्याचा पाठपुरावा करून पालकमंत्री उदय सामंत यांनी अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या आज स्वाक्षऱ्या घेऊन राजापूरवासीयांना गिफ्ट दिले आहे. वाटुळ राजापूर येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलला खास बाब म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंजुरी दिली आहे.

आजारांना दूर सारा

वाटूळ येथील मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी 15 ऑगस्टची मुदत देण्यात आली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 8 दिवसांतच प्रश्न मार्गी लावला. याबाबत पालकमंत्री उदय सामंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमं६ी तानाजी सावंत यांचे आभार मानले आहेत. 


Post a Comment

0 Comments