Header Ads Widget

BARASU SOLGOAN REFINERY : रिफायनरी विरोधी संघटनांचा एल्गार


BARASU SOLGOAN REFINERY : रिफायनरी विरोधी संघटनांचा एल्गार

मुंबईकर यांना साद "चलो आझाद मैदान" 

एकच जिद्द रिफायनरी रद्द

 - संदीप शेमणकर

मुंबई -  बारसू सोलगाव रिफायनरीला दिवसेंदिवस विरोध वाढत असून रिफायनरी विरोधी संघटना आक्रमक झाल्या आहेत. राज्य सरकारचे पावसाळी अधिवेशन आहे. त्यामुळे मंगळवार दिनांक ९ जुलै रोजी मुंबईतल्या आझाद मैदानात रिफायनरीविरोधक संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे. पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारण्यासाठी आझाद मैदानात आंदोलन करण्यात येणार आहे. 

चकाचक

विद्यमान सरकारच्या कार्यकालातले हे शेवटचे अधिवेशन आहे. या सरकारला तसेच लवकरच होणाऱ्या विधानसभा निवडणुकात  निवडून  येणाऱ्या नवीन सरकारला आपल्या पंचक्रोशीचा रिफायनरी विरोधाचा ठाम निर्धार दाखविण्यासाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनासाठी लागणारा आर्थिक  निधी उभारून  आंदोलन यशस्वी करण्यासाठी आपण सर्वानुमते ठरवल्याप्रमाणे  हातभार लावावा, असे आवाहन रिफायनरी विरोधी संघटनांकडून करण्यात आले आहे. 

भारी वाटतंय

'एकच जिद्द रिफायनरी रद्द'चा नारा देत बारसू - सोलगाव पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटना पुन्हा एकदा सरकार विरोधात आक्रमक झाली आहे. रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी ठोस भूमिका रिफायनरी विरोधी संघटनांनी घेतली आहे. आता सरकार या संघटनांच्या मागणीकडे लक्ष देणार आहे की पुन्हा आश्वासनांची खैरात करणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Post a Comment

0 Comments