Header Ads Widget

BUS STOP : ना बस स्टॉप, ना बसता येत


BUS STOP :  ना बस स्टॉप, ना बसता येत 

डोंबिवलीत बस स्टॉपची झाली दुरवस्था ! जाहिरात फलकही धोकादायक स्थितीत

- संदीप शेमणकर

डोंबिवली - डोंबिवली पूर्व, टिळक चौकमधील स्टेट बँकसमोर असलेला केडीएमटी बस सेवेच्या बस स्टॉपची दुरवस्था झाली आहे. या बस स्टॉपवरील जाहिरात कंपनीचा फलक तुटून आणि सडून खाली पडला आहे. 

या रस्त्यावरून वाहनांची सतत वर्दळ असते. बस स्टॉपवरील फलक केव्हाही पडल्यास किंवा वाहनाच्या धक्का त्याला लागल्यास त्यातील गंजलेल्या पत्र्यामुळे दुर्घटना होऊ शकते. कल्याण, एमआयडीसी निवासी इत्यादी ठिकाणी जाण्यासाठी हा बस स्टॉप आहे. यात प्रवाशांना बसण्यासाठी बाकडी नसल्याने तसेच छप्पर तुटल्याने प्रवासांना धड उभेही राहता येत नाही किंवा धड बसताही येत नाही

भारी सफारी, घ्या भरारी

बससाठी वाट पाहणारे प्रवासी रस्त्यावर उभे राहतात, तेव्हा एखाद्या वाहनांचा धक्का त्यांना लागू शकतो. एमआयडीसी निवासी हा केडीएमटीचा सर्वात फायदेशीर बस मार्ग असताना केडीएमसी, केडीएमटी प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.  यापूर्वी नवीनच बांधलेल्या पेंढरकर कॉलेज बस स्टॉपची झालेली दुरवस्था त्यांच्या निर्दशनास आणूनही त्यावर काहीच कार्यवाही झालेली नाही. 

विशेष म्हणजे कोणीही लोकप्रतिनिधी, राजकीय पदाधिकारी याबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यामुळे येथील नागरिक आणि प्रवाशांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. 

Post a Comment

0 Comments