ajit pawar : अजित पवारांची फटेकबाजी
अधिवेशनात रंगली सूर्यकुमारच्या कॅचची
खास प्रतिनिधी
मुंबई - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सूर्यकुमारच्या कॅचवरून चांगलीच फटकेबाजी केली. वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवने अखेरच्या ओव्हरमध्ये अफलातून कॅच घेतला. या कॅचची क्रिकेटचाहत्यांसह राजकारण्यांमध्येही चर्चा रंगली.
टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर मुंबईत जंगी स्वागत करण्यात आले. आज भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधानभवनात सत्कार करण्यात आला.
या वेळी रोहित शर्माने या विधीमंडळातील सत्कारादरम्यान सूर्यकुमार यादवच्या कॅचबाबत वक्तव्य केले. 'सूर्याने आता सांगितले की, बरे झाले त्याच्या हातात बॉल बसला. नाहीतर पुढे त्याला मी बसवला असता, असं रोहित शर्माने म्हटले. रोहित शर्माच्या या वक्तव्यावर बोलताना अजित पवारांनी फटकेबाजी केली. अजित पवार म्हणाले, 'रोहितनं सांगितलं की, कॅच नसता घेतला तर तुझ्याकडे बघितलं असतं, पण रोहितनं एकट्यानं बघितलं नसतं आम्ही पण बघितलं असतं.'
अजित पवारांची फटकेबाजी
'गेल्या काही काळात क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. महेंद्रसिंग धोनीसह अन्य काही खेळाडूंनी यश मिळवले, मात्र विधिमंडळातमध्ये असा दिमागदार कार्यक्रम झाला नव्हता. विधिमंडळात खेळाडूंच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केल्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. टी-20 च्या अंतिम सामन्यात 30 चेंडूंमध्ये 30 धावा बाकी होत्या. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू ज्याप्रमाणे खेळत होते ते पाहून टीम इंडियाच्या चाहत्यांनी आशा सोडली होती, मात्र कुठे तरी वाटत होतं की काहीतरी चमत्कार घडेल आणि अखेर तो चमत्कार घडलाच,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
'रोहित शर्मा, सूर्यकुमार यादवचे कौतुक करतो. कारण ज्या प्रकारे सूर्यकुमारने कॅच घेतला. त्याचा पाय बाहेर टेकला असता तर आजचा दिवस पाहायला मिळाला नसता. त्यामुळे सूर्यकुमार यादवचे कौतुक करतो. संपूर्ण भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते, अशीही फटकेबाजी अजित पवार यांनी केली.
0 Comments