Header Ads Widget

आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्डचे वाटप


आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई-श्रम कार्डचे वाटप

- संदीप शेमणकर

नालासोपारा -  नालासोपारा (पश्चिम) येथे स्वराज अभियान अध्यक्ष धनंजय गावडे यांच्या वतीने आणि महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांच्या माध्यमातून नालासोपारातील समेळगाव येथील दत्त मंदिर येथे मोफत आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, ई श्रम कार्ड शिबिराचे आणि लाडकी बहीण योजनेचे मोफत फॉर्म वाटप करून महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.

राज्यातील सर्व नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड आणि आभा कार्ड आवश्यक आहे. आयुष्यमान भारत कार्डचा माध्यमातून नागरिकांना पाच लाखापर्यंत मोफत उपचार घेता येणार आहे.

घडी असावी तर अशी...

आभा कार्ड नावाने डिजिटल स्वरूपातील हेल्थ आयडी मिळणार असून या कार्डवर तुमचा वैद्यकीय इतिहास, चाचण्या केलेले उपचार आदी माहिती साठवली जाणार आहे. ही सर्व माहिती डिजिटल स्वरूपात आभा कार्डवर साठवली जाणार असल्यामुळे नागरिकांना तसेच डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी यांना रुग्णांची पार्श्वभूमी म्हणजेच मागील आजार, निदान, उपचार आदींची माहिती जलद आणि सोयीस्करपणे समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होणार आहे. आभा हेल्थ कार्डच्या मदतीने देशभरातील सर्व हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

आभा कार्ड हे ‘डिजिटल कार्ड’ असून त्यावरील ‘क्यूआर कोड’ स्कॅन केल्याने संबंधित व्यक्तीची सर्व वैद्यकीय माहिती त्वरित उपलब्ध होते. भविष्यात आपल्या फॅमिली डॉक्टर, पॅथॉलॉजि आणि रुग्णालयात कुठेही आपण गेलात, तर ‘आभा कार्ड’ अनिवार्य मागितले जाईल. या शिबिरात एकूण ४५० नागरिकांनी सहभाग घेऊन आपले मोफत कार्ड बनवले.

नारीशक्तीच्या विकासाला प्राधान्य देणार

दुर्बल, अतिदुर्बल आर्थिक स्थितीतल्या महिलांनाही आत्मसन्मानाने जगता यावे आणि त्या ताईला स्वतःचे  काहीतरी आर्थिक उत्पन्न असावे जेणेकरून ती स्वयंपूर्णतेच्या दिशेने वाटचाल करू शकेल या हेतूने "लाडकी बहीण योजना"  नुकतीच लागू केली आहे. 

योजनेची विशेषता काय आहेत, त्यात कोण अर्ज भरू शकते ऑफलाईन फॉर्म आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, याबाबत महिलांना मार्गदर्शन करून मोफत फॉर्म वाटप करण्यात आले. योग्य मार्गदर्शन करून सहकार्य केल्याबद्दल नागरिकांनी स्वराज अभियानचे अध्यक्ष धनंजय गावडे यांचे विशेष आभार मानले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार रवींद्र माने, दत्त मंदिर ट्रस्टी हेमंत कर्णिक, महिला शहरप्रमुख रुचिता नाईक, उपशहरप्रमुख महेश निकम यांचे सहकार्य लाभले.


Post a Comment

0 Comments