Header Ads Widget

vat paurnima : कोंकणातील फणसांना मुंबईत मोठी मागणी


vat paurnima : वट पौर्णिमा : कोंकणातील फणसांना मुंबईत मोठी मागणी

 रत्नागिरी -  हापुस आंब्याबरोबर कोकणात फणसही मोठ्या प्रमाणात होतात. वटपौर्णिमेला फणसाला मोठी मागणी असते. वटपौर्णिमेनिमित्त कोकणातून मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये फणसाला मोठी मागणी असते. छोटे. मोठ्या फणसांची किंमत अगदी दीडशे-दोनशेपासून ते ४०० रुपयांपर्यंत असते.

वटपौर्णिमा असल्याने महामार्गावर फणस विकण्यासाठी ठेवण्यात आले आहेत. फणस मुंबई, पुणे, कोल्हापूर आदी शहरात पोहोचू लागले आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली असून फणस स्वस्त किमतीत विकले जात आहेत. तसेच मुंबईकडे जाणारे चाकरमानी फणस घेऊनच मुंबईला जात आहेत. बरक्या (रसाळ) फणसाबरोबर काप्या फणसालाही चांगली मागणी आहे. महामार्गावर कापा जातीचा फणस हा २०० ते ५०० रुपयांपर्यंत  तर बरका फणस १५० ते पाचशे रुपये र्यंत विक्रीला जात आहे.

Post a Comment

0 Comments