शैक्षणिक साहित्याचे वाटप : क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेचा उपक्रम
राजापूर - क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेच्या वतीने प्राथमिक केंद्र शाळा कारवली नं. १ येथील पहिली ते सातवी इयत्तेतील सर्व विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणाऱ्या वह्यांचे मोफत वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. क्षत्रिय धार पवार चॅरिटेबल संस्थेचे उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग प्रभारी तुषार विश्वासराव यांच्या अध्यक्षतेखाली आणि कारवली केंद्राचे केंद्र प्रमुख विनायक खानविलकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष आणि सिंधुदुर्ग प्रभारी तुषार विश्वासराव, केंद्र प्रमुख विनायक खानविलकर, संस्थेचे सदस्य विनोद पवार, संभाजी राजे पतसंस्थेच्या संचालिका विनया पवार, पत्रकार सुरेश गुडेकर, शिक्षक नथुराम बांबरकर, राजेश जाधव, गोविंदा वाल्ये, ललिता जाधव, निवृत्त शिक्षक उदय साळवी, शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ गणेश वरेकर, माजी पोलीसपाटील वसंत विश्वासराव, पालक विनायक विश्वासराव, रुचिता पांचाळ, दीक्षा कदम, माजी सरपंच प्रांजली ठिक आदी उपस्थित होते.
तुषार विश्वासराव यांनी क्षत्रिय धारपवार चॅरिटेबल संस्थेबाबत तसेच गेल्या दोन वर्षात राबवलेल्या कार्यक्रमाचीही माहिती दिली.
क्षत्रिय धारपवार संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व शिक्षकवृंद आणि पालकांनी कौतुक करून संस्थेला धन्यवाद दिले.


0 Comments