MHT CET exam : सीईटी क्रॅश कोर्स - आडिवरे हायस्कूल चमकले
आडिवरे - राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातील श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे या शाळेच्या नुकत्याच जाहीर झालेल्या MHT CETच्या निकालात गुरुकला लक्ष्मीकांत पांचाळ हिने ८७.८८ टक्के गुण मिळवले. तसेच काजल अभिजीत पेटावे हिने ८३.४९ टक्के मार्क्स मिळवले आणि शाळेचे नाव उज्ज्वल केले.
सामाईक प्रवेश परीक्षांचे वाढते महत्त्व लक्षात घेता श्री महाकाली परिसर संयुक्त शिक्षण समितीतर्फे मार्गदर्शन वर्गाची सुरुवात करण्यात आली. विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश हे प्रेरणादायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पोचपावती देणारे असल्याने संस्था पदाधिकारी, मुख्याध्यापक, पालक, ग्रामस्थ यांनी मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थी यांचे अभिनंदन केले. या वर्गासाठी ज्यूनियर कॉलेजच्या विज्ञान विभागाचे शिक्षक सचिन नांदगावकर, मंगेश चव्हाण , प्रसाद वारीक, सायली सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
गुरुकला आणि काजळ या विद्यार्थिनी विविध स्तरातून कौतुक होत आहे.
'आडिवरे टाइम्स' परिवाराकडून गुरुकला आणि काजळ यांचे अभिनंदन
.png)

0 Comments