आसपास बघ्यांची गर्दी, वाचवायला आलं नाही कुणी
तरुणीच्या हत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल
'आरोपीवर आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र करावे'
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचे पोलिसांना निर्देश
- संदीप शेमणकर
वसई - वसईत प्रियकराकडून प्रेयसीची भररस्त्यात हत्या करण्यात आली. प्रियकराने प्रेयसीची लोखंडी स्पॅनरनं वार करुन हत्या केली. अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे, तरुणानं भर वर्दळीच्या रस्त्यात तरुणीला गाठून तिच्यावर लोखंडी स्पॅनरनं वार केले. तरुण तिच्यावर एका पाठोपाठ एक वार करत होता, मात्र आजूबाजूला बघ्यांची गर्दी जमली होती. तरुणीला वाचवण्यासाठी कुणीच पुढाकार घेतला नाही. तर, कुणीच साधं पोलिसांना कळवण्याची तसदीही घेतली नाही. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
वसईत प्रियकरानं प्रेयसीची भररस्त्यात निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचपाडा परिसरात घडली. तरुणाचा दिवसाढवळ्या निर्घृणपणे हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे.
वसई पूर्वेच्या चिंचपाडा परिसरात काल सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरती यादव (वय २०) असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे. रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
लोखंडी स्पॅनर डोक्यात मारून विकृत तरुणानं तरुणीला सर्वांसमोर जीवे मारलं. हत्या करताना बघ्यांची नुसतीच गर्दी जमली होती. मात्र, तरुणीच्या बचावासाठी कुणीही पुढे धजावलं नाही. सध्या आरोपीला वालीव पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तरुणीच्या हत्येची राज्य महिला आयोगाकडून दखल
आरोपीवर आवश्यक ती कलमे जोडून ठोस दोषारोपपत्र पोलिसांनी करावे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना निर्देश दिले आहेत. याप्रकरणी आरोपीला कठोर कारवाई व्हावी यासाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. पोलीस निरीक्षक नन्नवरे यांना फोन करून आरोपीवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर आरोपीवर कडक कारवाई होईपर्यंत राज्य महिला आयोग लक्ष घालेल, असे रूपाली चाकणकर म्हणाल्या. वसईमध्ये आज भररस्त्यात तरुणाने मुलीवर वार करत तिची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून आरोपीला वालीव पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून मी स्वतः वालीव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे, असे रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.
.png)
0 Comments