Narayan Rane : कोकणातून मी शिवसेना संपवली!
ठाकरेंच्या जखमेवर नारायण राणेंनी मीठ चोळलं
Konkan Political News : नारायण राणे एकेकाळचे कट्टर शिवसैनिक. शाखाप्रमुख, नगरसेवक, बेस्टचे अध्यक्ष, आमदार ते मुख्यमंत्री, अशी पदे शिवसेनेत असताना नारायण राणे यांना मिळाली होती. आता मात्र राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही. भाजपचे खासदार असलेल्या नारायण राणे यांनी कोकणातून मी शिवसेना संपवली असे विधान करून ठाकरेंच्या जखमेवर मीठ चोळले आहे.
"कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यांत शिवसेना कुठेच नाही. 'कुणी आडवे आले, तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ', असे म्हणणाऱ्यांचा पायच आम्ही बाजूला केला आहे," असा इशाराही नारायण राणे नारायण राणे यांनी दिला आहे.
लोकसभेला महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाले, याबद्दल प्रश्न विचारल्यावर नारायण राणे म्हणाले, "एका निवडणुकीत मताधिक्य मिळाले म्हणून पुढे ते टिकेल, असे नाही. या निवडणुकीनंतर आता आम्ही जागृत झालो आहोत. विधानसभेत हे राज्य जिंकावे म्हणून आम्ही प्रयत्न करणार," असा विश्वासही राणेंनी व्यक्त केला.
विधानसभा निवडणुकीत विजय होईल, असा दावा महाविकास आघाडीने केला आहे. त्यावर राणेंनी म्हटले, "आम्हीही सांगतोय, आम्हीच पुन्हा सत्तेत येणार आहोत. आम्ही सत्तेत आहोत आणि राहणारच आहे. जसे केंद्रात भाजप सरकार आले आणि नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. त्यामुळे कुणी दावा केल्याने काही फरक पडत नाही."
"कोकणातून मी शिवसेना संपवली. पाच जिल्ह्यात शिवसेना कुठेच नाही. 'कुणी आडवे आले, तर त्यांच्यावर पाय देऊन पुढे जाऊ' म्हणणाऱ्यांचा पायच आम्ही बाजूला केला आहे. कोकणातून साफ केले आहे. आता कुणालाही शिरकाव करू देणार नाही," असा इशाराच राणेंनी ठाकरेंना इशारा दिला आहे. यावर ठाकरे गटाकडून राणेंना काय उत्तर मिळणार, याकडे लक्ष आहे.
source : sarkarnama.esakal.com
.png)
0 Comments