'नासा रिटर्न' विद्यार्थ्यांचे पालकमंत्री उदय सामंतांकडून स्वागत
- संदीप शेमणकर
रत्नागिरी - अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राला भेट देऊन परतलेल्या जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री उदय सामंत यांनी आज स्वागत केले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी अमेरिकेला जाणे ही मोठी घटना असल्याचे यावेळी पालकमंत्री म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई आदी उपस्थित होते.
नाव, शाळेचे नाव, गावाच्या नावाची विचारणा करुन पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी मनमुराद गप्पा मारल्या. कुठं जाऊन आला? अमेरिकेत जाऊन काय पाहिले? असे प्रश्न विचारुन त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली आणि भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |


0 Comments