स्वातंत्र्यदिनी उपोषणचा माहिती अधिकार रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीचा इशारा
तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सक्रिय होण्याचे जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांचे आवाहन
- संदीप शेमणकर
रत्नागिरी - विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्ट २०२४ रोजी अर्थात स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्यात येणार असून विविध तालुक्यातून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणीची पहिलीच विशेष सर्वसाधारण सभा जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
या सभेत तालुक्यातील अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे उद्घाटन माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे सचिव समीर शिरवाडकर यांचे हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला पुष्पहार घालून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आरटीआय कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्यचे कोकण उपाध्यक्ष दयानंद निकम, जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, जिल्हा उपाध्यक्ष राज बोथरे, कार्याध्यक्ष रमजान गोलंदाज, प्रमुख योगेश पेढांबकर उपस्थित होते. राज बोथरे यांनी प्रास्ताविक केले.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
व्यासपीठावरील मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या सभेत समीर शिरवाडकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले, तर आदेश खाडे, सुरेश खेडेकर, योगेश पेढांबकर, हरिश्चंद्र गुरव, स्नेहल गुरव यांनी आपले विचार मांडले. जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव यांनी महासंघाला बळकट करायचे असून सर्वांनी संघटित होऊन काम करणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्यात संघटना मजबूत करण्यावर भर दिला जाणार असून पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुका संघटना बांधणीचे काम करावयाचे आहे. तालुक्याची कार्यकारिणी त्वरित करावी आणि इतर तालुक्यात प्रत्येक पदाधिकारी कार्यकारिणी करण्यासाठी यांनी लक्ष घालावे, असे आवाहन केले.
विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ ऑगस्ट २०२४ रोजी अर्थात स्वातंत्र्यदिनी उपोषण करण्यात येणार असून विविध तालुक्यातून सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक विषयांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात आले. यावेळी तालुक्यातून शेखर जोगळे, अध्यक्ष, संगमेश्वर, स्वाती हडकर, अध्यक्ष चिपळूण, आदेश खाडे रत्नागिरी, राजेंद्र पावसकर रत्नागिरी, दीपक भेरे, गणेश खळे, कार्याध्यक्ष विजय चव्हाण, स्नेहल गुरव, कार्याध्यक्ष महिला विभाग, सुनील करंडे, राजू घोसाळकर, प्रमोद साळवी, सुरेश घडशी, सुरेश खेडेकर, प्रमोद रेवणे, विजय साळुंखे, सुशीला कदम, अरविंद मोहिते, सचिन कास्टे, प्रकाश आढाव, सुभाष लांजेकर, हरिश्चंद्र गुरव यांनी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी राज बोथरे यांनी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.


0 Comments