Header Ads Widget

SHIVSENA UBT VARDHAPAN DIN : ठाकरे गरजले, विरोधक नरमले



SHIVSENA UBT VARDHAPAN DIN : ठाकरे गरजले, विरोधक नरमले

शिवसेना वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंचा मोदींसह एकनाथ शिंदे, राज ठाकरेंवर हल्लाबोल! 

मुंबई - शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ठाकरे यांनी राज्यातील विरोधकांसह पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्यावरह निशाणा साधला.

षण्मुखानंदमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विधानसभा निवडणुकीचा प्रचार आत्तापासून सुरु करा, असं आव्हान दिलं. मोदी सरकार लवकर पडून मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, असेही मत त्यांनी मांडले

शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्षाच्या दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा मेळावा वरळीमधील डोममध्ये झाला. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात पार पडला.

षण्मुखानंदमधील सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विधानसभा निवडणुकीचा प्रचार आत्तापासून सुरु करा, असं आव्हान दिलं

शिवसेनेतील फुटीनंतर जनतेच्या न्यायालयातील लढाई आम्ही जिंकलो आहोत. आता आमदारांच्या अपात्रतेवर ‘तारीख पे तारीख’ करण्यापेक्षा सर्वोच्च न्यायालयाने लवकरात लवकर निर्णय द्यावा, अशी प्रार्थना वा अपेक्षा आपण सर्वोच्च न्यायालयाला करीत आहोत, अशी भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात मांडली.

मोदी सरकार लवकर पडून मध्यावधी निवडणुका व्हाव्यात, असेही मत त्यांनी मांडले. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर भाजप, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली

लोकशाही संपविण्याचा विडा उचलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाने वेळीच आवर घालावा, अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्त केली. आमदारांच्या अपात्रतेवर निर्णय होईपर्यंत विधान परिषदेच्या ११ जागांसाठी जाहीर झालेली निवडणूक होऊ नये, अशी मागणीही ठाकरे यांनी केली.

देशाची लोकशाही, संविधान वाचावे यासाठी अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांनी इंडिया आघाडीला मतदान करा, असा प्रचार केला. या संस्थांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘शहरी नक्षलवादी’ म्हटले आहे. पण केंद्रीय व राज्याच्या यंत्रणांचा दुरुपयोग करून अटकेची भीती दाखवीत केलेला हा ‘सरकारी नक्षलवाद’ आहे, असे प्रत्युत्तर ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिले. हुकूमशाही तोडा, फोडा आणि लोकशाही, संविधान वाचवा त्याला हे शहरी आतंकवाद ठरविणार असतील तर हो, मी आतंकवादी आहे अशी स्पष्टोक्ती ठाकरे यांनी दिली.

‘मी पुन्हा येईन’ असे म्हणणारे आता ‘वाजविले की बारा आता जाऊ द्या की घरी’, असे म्हणू लागले आहेत, असे सांगत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. उद्धव ठाकरे यांना विरोध म्हणून काही जणांनी भाजपला ‘बिनशर्ट’ म्हणजे उघड किंवा उघडा पाठिंबा दिला होता, असा चिमटा ठाकरे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांना उद्देशून काढला.

source - www.loksatta.com

Post a Comment

0 Comments