Header Ads Widget

निशाणा... 'बसला' ना? : ‘वाजविले की बारा आता जाऊ द्या की घरी’


निशाणा...'बसला' ना ? ‘वाजविले की बारा आता जाऊ द्या की घरी’

उद्वव ठाकरे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई - मुंबईत उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वर्धापन दिनाच्या भाषणात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर ठाकरी शैलीत निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतील म्हणावे तसे यश न मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारीतून मोकळं करा अशी मागणी केंद्रीय नेतृत्वाकडे केली होती. याचा धागा पकडत उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणणारे आता ‘वाजविले की बारा आता जाऊ द्या की घरी’, असे म्हणू लागले आहेत, असे सांगत ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला.

राज ठाकरेंवर टीका

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला होता. या पाठिंब्याची महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात चर्चा रंगली होती. मात्र राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही.

मनसेचा पलटवार

'हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्यामुळे काही लोक पांचट जोक मारत आहेत. मात्र येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार नाही', अशी खोचक शब्दांत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. 



Post a Comment

0 Comments