Header Ads Widget

free st bus service : लालपरी, तिची सेवाच भारी


free st bus service : लालपरी, तिची सेवाच भारी

शहरी बस वाहतुकीमध्ये महिला व ज्येष्ठांना ५० टक्क्यांत तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास

- संदीप शेमणकर

रत्नागिरी -  राज्य परिवहन विभागामध्ये राज्य परिवहन रत्नागिरी आगाराच्या शहरी बस वाहतुकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के आणि महिलानां ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. २२ जून मध्यरात्रीपासून ही सवलत लागू करण्यात येत असल्याची माहिती विभाग प्रमुख नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी दिली.        

७५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तसेच ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीसाठी आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, केंद्र / राज्य शासनाचे सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांना दिलेली ओळखपत्र (मात्र त्यावर फोटो, जन्मतारीख, रहिवासी पत्ता अनिवार्य आहे). पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, तहसीलदार यांनी दिलेली ओळखपत्र, डी. जी. लॉकर, एम आधार व रा.प. महामंडळाद्वारे देण्यात आलेले स्मार्ट कार्ड ही ओळखपत्रे ग्राह्य धरण्यात येतील, अशीही माहिती त्यांनी दिली.

Post a Comment

0 Comments