Header Ads Widget

after three years : 'ती' तीन वर्षे


after three years : 'ती' तीन वर्षे

- संदीप शेमणकर

राजापूर -  गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेले अणसूरेचे तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष गावकर घरी परतले आहेत. त्यामुळे गेल्या महिन्यांपासून संतोष गावकर परत येतील या आशेवर वाटेकडे डोळे लावून बसलेल्या त्यांच्या कुटुंबायांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. संतोष गावकर घरी परतल्याची माहिती नाटे पोलिसांनी दिली आहे. 

राजापूर तालुक्यातील अणसुरे आडीवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य  संतोष दत्ताराम गावकर सप्टेंबर २०२१ पासून बेपत्ता होते. तशी तक्रार सागरी पोलीस ठाणे नाटे येथे त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आली होती. अत्यंत मनमिळाऊ आणि प्रत्येक कार्यात हिरिरीने सहभाग घेणाऱ्या संतोष गावकर यांच्या आकस्मिक बेपत्ता होण्यामुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे आणि भीतीचे वातावरण होते.

२०२१ मध्ये ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर ते बेपत्ता झाले होते. गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे कुटुंबीय आणि पोलीस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्यामध्ये यश आले नव्हते. काही दिवसांपूर्वी त्यांनी स्वतः कुटुंबीयांशी संपर्क साधत आपण सुखरूप असल्याचे सांगितले आणि ते नुकतेच कुटुंबीयांमध्ये परतले. 

गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत पालघर वाडा, नाशिक या भागात वास्तव्यास असल्याचे  संतोष यांनी कुटुंबीयांना आणि पोलिसांना सांगितले. त्यांच्या बेपत्ता  झाल्यानंतर परिसरात भीती आणि उलट सुलट चर्चा सुरू होत्या. ते तीन वर्षांनंतर ते सुखरूप आपल्या परतल्याने कुटुंबीय आणि मित्र परिवारातून आनंद व्यक्त करण्यात आला. गावकर कुटुंबीयांमध्ये परत आल्याची माहिती सागरी पोलीस ठाणे नाटे यांना देण्यात आली.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी


Post a Comment

0 Comments