Header Ads Widget

माजी आमदार गणपत कदम यांना बंधूशोक


माजी आमदार गणपत कदम यांना बंधूशोक

राजापूर -  राजापूरचे माजी आमदार गणपत कदम यांचे लहान भाऊ अशोक दौलत कदम (७०) यांचे शुक्रवारी सायंकाळी मुंबई मिरा रोड येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

मुंबईत मिरा रोड येथे वास्तव्यास असलेले अशोक कदम हे मुंबईत महावितरण कंपनीमधून नियत वयोमानुसार सेवानिवृत्त झाले होते. महावितरण कंपनीत असताना त्यांनी महवितकरण कंपनीच्या कबड्डी संघाचे व्यवस्थापक म्हणूनही काम पाहिले. एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती.  

साडेतीन वर्षापूर्वी अशोक यांच्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते, मात्र ते निष्फळ ठरले होते. त्यानंतर त्याच पायावर पडल्याने त्यांना चालता येत नव्हते.  दोन ते तीन दिवसापूर्वी त्यांची प्रकृती अधिकच खालावली व त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक विवाहित मुलगा, दोन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे, भाऊ, पुतणे असा परिवार आहे.

Post a Comment

0 Comments