Header Ads Widget

dande-ansare bridge : दांडे पुलाचे काम अंतिम टप्प्यात, दीपक नागलेंकडून पाहणी


dande-anusare bridge : दांडे पुलाचे काम अंतिम टप्प्यात

रत्नागिरी - दांडे-अणसुरे पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या कामाची पाहणी शिंदेंच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख दीपक नागले यांनी नुकतीच केली. सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे या पुलाच्या कामाची पाहणी करण्यात आली.

दांडे - दांडे-अणसुरे पुलाच्या दुरुस्ती कामाच्या ठिकाणी दीपक नागले यांनी १५ जूनला भेट देऊन पाहणी केली होती. या पावसाळ्यात या पुलावरून सुरळीत वाहतूक सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे, हे काम वेळीच पूर्ण व्हावे यासाठी सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली पाठपुरावा सुरू होता. या वेळी  हे काम अंतिम टप्प्यात आले असून येत्या पंधरा दिवसात हा पूल वाहतुकीस खुला होईल, असा विश्वास नागले यांनी व्यक्त केला होता. त्यामुळे जनतेची होणारी गैरसोय दूर होईल, असेही दीपक नागले यांनी सांगितले होते. 

सागरी महामार्गावरील सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणारा राजापूर तालुक्यातील दांडे-अणसुरे पुलाच्या दुरूस्तीचे काम गेले वर्षभर अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सदरचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होऊन वाहतुक सुरू होईल असा दावा प्रशासनाने केला होता. मात्र काम पूर्ण झालेले नव्हते. त्यामुळे लवकरात लवकर हे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीने किरण सामंत यांनी प्रशासनाला सूचना केल्या होत्या. तर पुलाअभावी स्थानिक जनतेची होणारी गैरसोय दूर व्हावी यासाठी किरण सामंत यांनी पर्यायी व्यवस्था केली होती. 

Post a Comment

0 Comments