Header Ads Widget

मोगरे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यवाटप


मोगरे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्यवाटप

कर्तव्यपर उपक्रम, माजी विद्यार्थ्यांचा पुढाकार 

- संदीप शेमणकर

राजापूर - आडिवरे परिसरातील मौजे मोगरे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेप्रणित 'मायेची सावली एक हात कर्तव्या'चा या संस्थेच्या वतीने मोगरे शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, खोडरबर, पेन्सिल, पेन, फुटपट्टी, पाऊच, चटईचे वाटप करण्यात आले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नालासोपारा (पश्चिम) पांचाळनगरचे उपशाखा प्रमुख सुनील सोनू  शिवगण यांच्याकडून भारतीय संविधानाचा फोटो एक मोगरे शाळेला, तर दुसरा फोटो बालवाडीसाठी देण्यात आला. सडेवाडी ग्रामविकास मंडळ यांच्या वतीने बालवाडीतील  प्रत्येक मुलांसाठी दप्तर व पाण्यासाठी बॉटल देण्यात आली. तसेच देणवाडी एकरूप मित्र मंडळ यांच्या वतीने बालवाडीसाठी दोन खुर्च्या भेट देण्यात आल्या.


कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कुंभार यांना सर्वांनुमते देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आणि श्री. सरस्वतीदेवी यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला.  दीपप्रज्वलन करून शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कुंभार यांनी  कार्यक्रमाचा शुभारंभ केला. 

यावेळी उपस्थित मान्यवर मोगरे गावचे गावप्रमुख सुभाष शिवगण, तुकाराम नाचणेकर, माजी सरपंच सुबोध नाईक, अनंत शेमणकर, मोगरे विकास मंडळचे अध्यक्ष काशिनाथ सातोपे, माजी अध्यक्ष गणपत पोकळे, पोलीसपाटील एकनाथ बाणे, पत्रकार संदीप शेमणकर, सुनील साखरकर, सुनील शिवगण, प्रकाश चव्हाण, संदेश साखरकर, अनिल बावकर, रवी जोशी, अभिषेक सातोपे, प्रमोद गिरकर, राजन गिरकर, सूर्यकांत गिरकर, सुरेश जानस्कर, राजेंद्र सातोपे तसेच मोगरे शाळेचे शिक्षक हेमंत पाटील गुरुजी, नांदगावकर गुरुजी, कटेरे गुरुजी, बालवाडी शिक्षिका प्रियंका बाणे, पारकर मॅडम आणि मदतनीस उपस्थित होत्या.


हेमंत पाटील गुरुजी यांनी उत्कृष्ट  सूत्रसंचालन करून सभागृहाचा आनंद द्विगुणित केला. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा कुंभार यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांनी शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. ग्रामस्थ महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी - जेथे विद्यार्थी आणि पालक घडतात


Post a Comment

0 Comments