राजापूर तालुका शिव सहकार सेना कार्यकरिणी बैठक
सहकार क्षेत्राच्या सर्व निवडणका शिव सहकार सेना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सोबतीने लढविणार - अनिल कदम
- संदीप शेमणकर
राजापूर - शिव सहकार सेना राजापूर तालुका कार्यकारिणी आणि मुंबई प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शनिवारी शिवसेना भवन, राजापूर येथे पार पडली. या बैठकीत पक्षबांधणी, पदाधिकारी नेमणुका आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकीबाबत धोरणे ठरवली गेली. शिव सहकार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिव सहकार सेनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी बैठकीतील आदेशानुसार महाराष्ट्रात सहकार क्षेत्राच्या सर्व निवडणुका शिवसेना - शिव सहकार सेना यापुढे लढवतील. या आदेशाची सविस्तर माहिती अनिल कदम यांनी सर्व कार्यकारिणी पदाधिकारी यांना दिली.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
यावेळी शिव सहकार सेना राजापूरच्या वतीने महाराष्ट्र उपाध्यक्ष अनिल कदम, महाराष्ट्र सचिव विलास पातेरे, रत्नागिरी (दक्षिण) जिल्हा संपर्क संघटक सुधीर मोरे, जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे यांचं पुष्पगुच्छ देऊन जिल्हा उप संघटक समीर शिरवडकर आणि तालुका संघटक विलास नारकर यांनी स्वागत केले. यावेळी रत्नागिरी जिल्हा सघटक चंद्रकांत शिंदे यांनी सहकार क्षेत्रातील महत्त्वाची माहिती पदाधिकाऱ्यांना दिली.
जाहिरात - अमृता कलेक्शन |
उत्तम खरेदीसाठी - https://amzn.to/3wZTWkF
यावेळी शिवसेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कदम, शिव सहकार सेनेचे जिल्हा उप संघटक समीर शिरवडकर, तालुका संघटक विलास नारकर, राजापूर अर्बन बँक च्या संचालिका तसेच शिव सहकारच्या महिला तालुका संघटिका प्रतिभा रेडीज, दुग्ध सोसायटीचे संचालक कानडे, तालुका सचिव मौलू कोले, विभाग संघटक अरविंद सप्रे, उप तालुका संघटक शंकर सोलगावकर,बाणे, राकेश आरंबेकर उपस्थित होते.
0 Comments