Header Ads Widget

देवाच्या दारी, प्लास्टिक भारी : कबड्डी संघाने स्वच्छता केली


श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्री प्लास्टिक बाटल्या, रॅपरचा कचरा

 देवरुखच्या फ्रेंड सर्कल हिंदवी कबड्डी संघाने राबवली स्वच्छता मोहीम

 - संदीप शेमणकर

देवरुख - पर्यटनस्थळ म्हणून श्री क्षेत्र मार्लेश्वर महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. याच ठिकाणी मे महिन्यात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांनी, पर्यटकांनी ठिकठिकाणी प्लास्टिकचा कचरा टाकलेला आढळून आला. हे पाहून देवरुख येथील फ्रेंड सर्कल हिंदवी कबड्डी संघातील खेळाडूंनी मार्लेश्वर येथे स्वच्छता मोहीम राबवली. 

फ्रेंड सर्कल हिंदवी कबड्डी संघातील खेळाडूंनी प्लास्टिक रॅपर, बाटल्या, अन्य वस्तू गोळा केल्या. मार्लेश्वर धबधबा परिसर, कंरबेळी डोह, मंदिर परिसर, दुकाने या ठिकाणी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवली. संघातील १० कबड्डीपटूंनी यात सहभाग नोंदवला. भाविक आणि पर्यटक यांनी खरे तर कचरा इतरत्र न टाकता डस्टबीनमध्ये टाकण्यात यावा, अशी अपेक्षा असते. देवस्थान कमिटी, मारळ ग्रामपंचायत व व्यापारीवर्गाने तशी सोय करणे गरजेचे आहे, मात्र तसे होताना दिसत नसल्याची चर्चा आहे. मार्लेश्वर धारेश्वर धबधबा पावसात नदीचे रुप धारण करतो. या नदीत हा सगळा कचरा साचला जातो. तसेच या ठिकाणी असणारे पशुपक्षी, वानरांना यापासून धोका होऊ शकतो.

हेही पहा - https://amzn.to/4cmIfnl

देवस्थान कमिटीने व व्यापारीवर्ग , ग्रामपंचायत यांनी हे पर्यटनस्थळाच्या स्वच्छतेकडे जागरुकतेने लक्ष दिले पाहिजे. देवरुखचे दक्ष नागरिक गणेश खामकर आणि इतर संघटनांनी दिलेले डस्टबीन गायब झाले आहेत.

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

मार्लेश्वर परिसर स्वच्छता मोहिमेत प्रथमेश कुलकर्णी, अण्णा बेर्डे, प्रतीक टक्के, सिद्धेश टक्के, गौरव यद्रे, केतन वेल्ये, अविराज पवार, अनिकेत भायजे, ओंकार परकर, प्रथम घडशी, दिनेश बांडागळे सहभागी झाले होते.

जाहिरात अमृता कलेक्शन

फ्रेंड सर्कल हिंदवी कबड्डी संघातील खेळाडूंनी केलेल्या स्वच्छतेबाबत त्यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments