सेवानिवृत्त केंद्रप्रमुख शिक्षकांचा सन्मान
ज्यांनी घडविले त्यांचा सन्मान करणे, हे कर्तव्यच - राजेंद्र पेडणेकर
कणकवली - माऊली मित्र मंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या हस्ते उत्तम आनंदा सूर्यवंशी यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी माऊली मित्र मंडळाचे पदाधिकारी व सदस्य अविनाश गावडे, सुभाष उबाळे उपस्थित होते. सूर्यवंशी गुरुजी यांच्या पत्नी, आई, वैशाली सामंत सूर्यवंशी उपस्थित होत्या. यावेळी राजेंद्र पेडणेकर यांनी सूर्यवंशी गुरुजींबद्दल गौरवोद्गार व्यक्त करताना असे म्हटले की, १९८९ मध्ये प्राथमिक शिक्षण देऊन असंख्य विद्यार्थी घडविले. २००८ मध्ये गुरुजींनी मुख्याध्यापक म्हणून तसेच २००९ मध्ये केंद्रप्रमुख म्हणून आदर्शवत शिक्षणाची सेवा केली. गेली ३५ वर्षे विद्यार्थी घडविण्यासाठी आपले आयुष्य वेचले. अशा या थोर व्यक्तिमत्वाला सन्मानित करताना विषेश आनंद होत आहे, असेही पेडणेकर म्हणाले. माऊली मित्र मंडळाचे उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांनी सूर्यवंशी गुरुजींना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments