Header Ads Widget

जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरण संदेशफेरी

 


जागतिक सायकल दिनानिमित्त पर्यावरण संदेशफेरी

- संदीप शेमणकर         

डोंबिवली -  एमआयडीसीमधील एका रासायनिक कंपनीत नुकताच झालेला स्फोट आणि डोंबिवलीतील वाढते प्रदूषण यानिमित्त आरोग्य आणि पर्यावरण जागृती करण्यासाठी ३ जून या जागतिक सायकल दिनाचे महत्त्व साधून मिलापनगर, एमआयडीसी निवासी भागात एक सायकल फेरी रविवारी सकाळी काढण्यात आली. विशेष म्हणजे या फेरीत पाच वर्षांचा मुलांपासून ते ७८ वयापर्यंत महिला सहभागी झाल्या होत्या. याचे आयोजन "एव्हरग्रीन सायकलप्रेमी" या महिलांच्या संघटनेने केले होते. सदर सायकल फेरीत एकूण ५७ मुले, महिला व काही पुरुष सहभागी झाले होते.

सायकल चालविल्याने आपले आरोग्य चांगले राहते तसेच प्रदूषणा रोखण्यास हातभार लागतो. हा मुख्यते उद्देश साधण्यासाठी एमआयडीसी निवासीमधील काही महिलांनी "एव्हरग्रीन सायकलप्रेमी" या नावाने ग्रुप तयार करून  हर्षल सरोदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जणांना सायकल शिकवण्यास सुरुवात केली आहे. आता त्या ग्रुपमध्ये अनेक महिला आणि मुलांंची संख्या पन्नासवर झाली असून त्यांनी असंख्य महिला आणि मुलांना सायकल चालविण्याचे धडे दिले आहेत. या ग्रुपने जुन्या सायकली अनेक जणांकडून घेऊन त्या स्वखर्चाने दुरुस्त करून घेतल्या आहेत. ज्या कोणाला आपल्या जुन्या /नव्या सायकली आणि हेल्मेट दान स्वरूपात द्यायचे असेल त्यांनी संपर्क साधून द्याव्यात अशी विनंती त्यांच्यातर्फे करण्यात आली आहे. 

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

याच एव्हरग्रीन सायकलप्रेमीतर्फे ५ जून या जागतिक पर्यावरण दिवशी उंबार्ली टेकडीवर वृषारोपण करण्यात येणार आहे तर २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन आणि वटपौर्णिमा याचे निमित्त साधून वडाच्या झाडाचे वृक्षारोपण आणि योग व्यायाम याचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. 

जाहिरात - अमृता कलेक्शन

जागतिक सायकल दिनानिमित्त काढलेल्या फेरीमध्ये आदिरा ठाकूरदेसाई, त्रिशा कुलकर्णी, अथर्व आठवले, सार्थक कुलकर्णी, मंथन नाईक, वैष्णवी चौगुले या लहान आणि तरुण मुलांमुलीबरोबर  सुवर्णा राणे, सरोज विश्वामित्रे, वर्षा महाडिक, योगिता थोटांगे, शोभा चौगुले, विभावरी वाघमारे, स्मिता पाठक, मनीषा तांबे, गौरी बर्वे, सरोज उपाध्ये, स्नेहा कुलकर्णी, विद्या जडे, सुनीता केसुर, रत्नमाला वाबळे, शोभना नाईक, मीना कुलकर्णी, उज्ज्वला नाईक, सुनीता यादव, कल्पना चौधरी, वैशाली हर्षे, सुनंदा मस्तुत, नीलिमा कुलकर्णी, अनुजा सावंत, दीपा नाईक, चैत्रा मोरे, सरिता दुसाने, नमिता सोनार, आराध्या शेट्टी, किशोरी कोळेकर, संगीता पोळेकर, कल्पना बोंडे, मुग्धा जोशी, श्रध्दा पटवर्धन, नालंदा शेवाळे, स्नेहल खापरे, अनिता जैस्वाल, किरण कानोजिया, अर्चना पाटील या महिला आणि राजु नलावडे, विजयकुमार चौगुले, विनायक पाटील इत्यादी सहभागी झाले होते.

visit - https://amzn.to/3X5Im1U

https://amzn.to/450ICS1

Post a Comment

0 Comments