दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
देवरुख - देवरुख ब्राह्मण सेवा संघातर्फे रविवारी ज्ञातीतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान श्री. सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुखच्या सभागृहात करण्यात आला.
ब्राह्मण सेवा संघाची नूतन कार्यकारिणीने ज्ञातीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये दहावी, बारावी, नीट परीक्षा तसेच इंजिनिअरींग क्षेत्रात नवीन संधी मिळाल्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पार्थ राजेश भागवत, ओजस महेश भागवत, मृगजा मिलिंद जुवेकर, शौनक समीर आठल्ये, श्रिया अमेय लिमये , नक्षत्रा दत्तात्रय सप्रे, जोशी वेदश्री वासुदेव, व्यंकटेश विश्वास फडके, आर्या जयंत राजवाडे, मानस मिलिंद रेमणे, अर्पिता निलेश हेबाळकर, पूर्वा योगेश सप्रे, मधुरा संजय मुळ्ये, वेदश्री दिनेश सरदेसाई, मनस्वी निनाद देसाई, ईशा अनंतकुमार मोघे,यश योगेश कुलकर्णी, गौतमी मंगेश सरदेसाई, गौरी श्रीकांत भागवत, श्रावणी सुनीलदत्त राजवाडे, नुपूर शेखर कुलकर्णी, ओंकार श्रीकांत गोडे, गायत्री माधव जोशी यांचा समावेश होता. विशेष सन्मान कॅम्पस सिलेक्शन म्हणून मैत्रेय मिलिंद जुवेकर व चैतन्य जयंत राजवाडे यांना सन्मानित करण्यात आले. सर्वांना ग्रंथपुष्प आणि श्री भगवान पर्शुरामांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.
जाहिरात |
यावेळी माजी अध्यक्ष भास्कर नरहर तथा अण्णा शहाणे, नूतन अध्यक्ष प्रा. संदीप मुळ्ये, उपाध्यक्षा मुग्धा पित्रे, सहकार्यवाह चैतन्य भागवत, अमेय लिमये, वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी आदींसह कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
जाहिरात- अमृता कलेक्शन |
भास्कर शहाणे यांनी ज्ञातीबांधवानी एकत्र येऊन आपली एकजूट दाखवली पाहिजे, असे आवाहन केले. प्रा.संदीप मुळ्ये यांनी संघातर्फे विविध उपक्रम राबण्यात येणार आहेत, याची माहिती दिली.
0 Comments