एक्झिट पोलची मोदी गॅरंटी! मोदी मारणार हॅटट्रिक? महाराष्ट्रात मविआला कौल?
#exitpoll #pmmodi #loksabhaelection2924 #maharashtra #mahayuti #mva
मुंबई -
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचे मतदान पार पडताच वृत्तवाहिन्यांवरील “एक्झिट पोल”चे अंदाज प्रसारित होऊ लागले आहेत. या सर्व एक्झिट पोलमध्ये देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा भाजप व एनडीए आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. एनडीए आघाडीला तब्बल ३५० तर इंडिया आघाडीला १५० पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावा करण्यात आला आहे.
यंदाच्या निवडणुकीत भाजपने दक्षिण भारतात पहिल्यांदाच जोरदार कामगिरी केली असल्याचे एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तामिळनाडू आणि केरळमध्ये भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी बजावली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार असतानाही भाजपला फारसे नुकसान झाले नाही. तेलंगणा, आंध्रप्रदेशातही एनडीएला अपेक्षित लक्ष्य साधण्यात यश आले आहे.
महाराष्ट्रात मात्र, एनडीए आघाडीला जोरदार फटका बसणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. भाजपसोबत असलेल्या शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या महायुतीला काँग्रेससोबतच्या शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार) गटाच्या महाविकास आघाडीने या निवडणुकीत जोरदार टक्कर दिली आहे. त्यामुळे एकूण ४८ जागांपैकी महाविकास आघाडीला महायुतीच्या बरोबरीने अथवा त्यांच्यापेक्षा जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड, झारखंडमध्ये भाजप आणि मित्र पक्षांची एनडीए आघाडी गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही सर्वच्या सर्व जागा जिंकण्याची कामगिरी बजावणार असल्याचे या अंदाजात म्हटले आहे. बिहार आणि राजस्थानात एनडीएला थोडे नुकसान होणार आहे. इंडिया आघाडीला या दोन्ही राज्यांत गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे.
एक्झिट पोलचे असे आहेत अंदाज
रिपब्लिक भारत : पी मार्क – एनडीए ३५९, इंडिया आघाडी १५४, इतर ३०
इंडिया न्यूज : डी डायनॅमिक्स – एनडीए ३७१, इंडिया १२५, इतर ४७
रिपब्लिक भारत : मॅट्रिझ एनडीए ३५३-३६८ इंडिया – ११८-१३३, इतर – ४३-४८
टीव्ही ५ तेलुगू : एनडीए ३५९, इंडिया – १५४, इतर – ३०
जन की बात : एनडीए ३६२-३९२, इंडिया १४१-१६१, इतर १०-२०
न्यूज नेशन : एनडीए ३४२-३७८, इंडिया १५३-१६९, इतर २१-२३
एबीपी-सी वोटर्स : एनडीए – ३५३-३८० इंडिया – १६२-१८२, इतर ०४-१२
दैनिक भास्कर : एनडीए- २८१-३५०, इंडिया – १४५-२०१, इतर – ३३-४९
SOURCE - PUDHARI NEWS
0 Comments