ऑल इंडिया रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत राजापुरातील यश प्रकाश कातकरचे सुयश
- संदीप शेमणकर
राजापूर - गोवा वास्को-द-गामा मर्मगाव येथे नुकत्याच झालेल्या ऑल इंडियाचे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धमध्ये राजापूर शहरातील राजापूर रॉयल चेस अकॅडमीचा विद्यार्थी यश प्रकाश कातकर याने सुयश संपादन केले. गोवा येथे झालेल्या या स्पर्धेत राजापूर रॉयल चेस अकॅडमीचे सोहम बावधनकर, शुभम बावधनकर, चिराग प्रभूदेसाई, साई गाडगीळ, चिन्मय बाकाळकर, नील कुडाळी, अमृत तांबडे, यश प्रकाश कातकर यांनी सहभाग घेतला होता. त्यात राजापूर तिथवली कातकरवाडी येथे राहणारे हॅपी होम इलेक्ट्रिकल्स व बोरवेलचे मालक तसेच अर्बन बँकेचे संचालक, प्रकाश कातकर यांचे सुपुत्र यश प्रकाश कातकर याने यश मिळवले, त्याला १५७१ इतके फिडे रॅपिड रेटिंग गुणांकन प्राप्त झाले. पहिल्याच प्रयत्नात इतके रेटिंग मिळाल्याबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, स्पर्धेसाठी या बुद्धिबळ खेळाडूंना राजापूर रॉयल चेस अकॅडमीचे सय्यद, साळवी, तांबडे यांचे मार्गदर्शन लाभले.
![]() |
| जाहिरात - अभिज्ञान अकादमी |


0 Comments