Header Ads Widget

मोगऱ्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा


मोगरे येथे आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा

राजापूर - राजापूर तालुक्यातील आडिवरे परिसरातील मौजे मोगरे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेत विविध योगासने आणि प्राणायामांची प्रात्यक्षिक विद्यार्थ्यासह शिक्षकांनीही केली.आरोग्यसेविका यांनी योगाचे महत्त्व, फायदे विद्यार्थांना सांगितले. केवळ योग दिनापुरते मर्यादित न राहता आपण नियमित आसने व  प्राणायाम करून आपली शरीरयष्टी मजबूत करू शकतो.

विद्यार्थ्यांनी वृक्षासन, ताडासन, त्रिकोणासन, पद्मासन, वज्रासन, भद्रासन, पवनमुक्तासन, धनुरासन, शवासन या योगासनांची व ध्यान, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी इत्यादी प्राणायामांची प्रात्यक्षिके केली. पाटील गुरुजींनी प्रात्यशिक करून दाखवली. मुख्याध्यापिका कुंभार, पाटील गुरुजी, नांदगावकर गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.


Post a Comment

0 Comments