Header Ads Widget

भालावली महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न


भालावली महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न

आडिवरे -  युवक विकास मंडळ संचलित कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय भालावली (धारतळे) मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. यावेळी आबासाहेब मराठे महाविद्यालय राजापूरचे प्राध्यापक प्रकाश कोंडसकर यांनी  विविध योगासनांचे प्रात्यक्षिक व त्यांची माहिती दिली. त्यांच्या मनोगतामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये योगविषयक आवड निर्माण करून योग संदर्भात प्रचार व प्रसार करण्यासाठी  सर्वांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

जाहिरात - अज्ञिज्ञान अकादमी

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालायचे प्र. प्राचार्य नामजोशी यांनी आपल्या देशात योगाची समृद्ध परंपरा आहे, त्याचे जतन आणि संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. आपल्या उत्तम शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी योग अभ्यासाचे महत्त्व खूप आहे, असेही त्यांनी सांगितले.  स्वतःसाठी व समाजासाठी योग ही या वर्षीच्या योग दिनाची थिम होती. योग दिनानिम्मित विद्यार्थ्यांना ई-शपथ देण्यात आली, त्याचप्रमाणे योगविषयक माहितीसाठी आयुष मंत्रालयाच्या वाय-ब्रेक या मोबाईल ॲपलिकेशनविषयी माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे विविध योग गुरूंच्या योगदानाविषयी माहिती घेण्यासाठी https://yoga.ayush.gov.in/YAP/Home2.php या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.  या कार्यक्रमाचे नियोजन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन महाविद्यालयातील प्रा. प्रणित लिंगायत यांनी प्र. प्राचार्य नामजोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Post a Comment

0 Comments