Header Ads Widget

रवींद्र चव्हाण कोकणातले किंगमेकर


रवींद्र चव्हाण कोकणातले किंगमेकर 

- संदीप शेमणकर

सिंधुदुर्ग - महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीने महायुतीला धोबीपछाड दिल्याचे दिसत असताना कोकणपट्ट्यात मात्र महायुतीला मतदारांनी कौल दिल्याचे स्पष्ट झाले. महायुतीतर्फे विशेषतः भारतीय जनता पार्टीतर्फे कोकणची धुरा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या खांद्यावर होती. चव्हाण यांच्याच अचूक नियोजनाच्या आणि अत्यंत आक्रमक पद्धतीने निवडणुका लढविण्याच्या कौशल्याने रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे कल्याण पालघर पट्ट्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला. 

रवींद्र चव्हाण कायम कार्यकर्त्यांच्यात मिळून मिसळून वागणारे नेते आहेत. दिवसातल्या कुठल्याही वेळेला थेट संपर्क साधता येणारे नेते असा  त्यांचा नावलौकिक आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आणि स्वातंत्र्यावीर सावरकरांच्या विचारधारेशी प्रामाणिक असलेला आपण एक कार्यकर्ता आहोत, असा ते नेहेमी उल्लेख करतात आणि ते करत असताना भाजपा पक्षवाढीसाठी, मतदानाचा टक्का वाढण्यासाठी, विरोधकांची मते आणि मने वळविण्यासाठी साम दाम दंड भेद अशा सर्व पद्धती वापरण्यात चव्हाण यांचा हातखंडा आहे. 

जाहिरात - अभिज्ञान अकादमी

तळकोकणातील रत्नागिरी सिंधुदुर्गपासून उत्तरेला दुसऱ्या टोकाला असलेल्या पालघरपर्यंत रवींद्र चव्हाण यांनी तळ ठोकून पक्षाच्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी केलेल्या मतांच्या नियोजनामुळे आणि विरोधी मतांच्या विभाजनाच्या क्लृप्त्यांमुळे महायुतीला ५-० असे निर्भेळ यश पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments