विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यवाटप
कोकण कला व शिक्षण संस्था, महाराजा युवा प्रतिष्ठान यांचा पुढाकार
- संदीप शेमणकर
रायगड - रायगड जिल्हा परिषद केंद्रीय शाळा तळेगाव आणि लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यासाठी कोकण कला व शिक्षण संस्था, महाराजा युवा प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला.
प्रतिवर्षीप्रमाणे रविवारी २३ जून २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा तळेगाव तसेच लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई या शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कोकण कला व शिक्षण संस्था आणि महाराज युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. महाराजा युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अंकुर कदम, दया पाटणे, वैभव कदम, भगवान शिंदे, शरद जाधव, किशोर कदम, विशाल कदम, प्रशांत पाटणे, मनीष अधिकारी, सुजित कदम, कृतिक कदम, प्रफुल पवार, तळेगाव जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम, शिक्षक विजय येवले तसेच लोकमान्य ज्ञानदीप विद्यामंदिर साई शाळेचे शिक्षक चंद्रकांत अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उपक्रमाबाबत रायगड जिल्ह्यातील विविध स्तरांतून कौतुकाची थाप मिळत आहे.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments