Header Ads Widget

लावली फासकी, अडकला बिबट्या


लावली फासकी, अडकला बिबट्या 

ब्लॅक पँथरची राजापूर वनविभागाकडून सुटका

 - संदीप शेमणकर

राजापूर  - राजापूर तालुक्यातील कुवेशी येथील एका आंबा कलमाच्या बागेला लावलेल्या तारेच्या फासकीत काळा बिबट्या (ब्लॅक पॅंथर ) अडकल्याची घटना बुधवारी घडली.  राजापूर वनविभागाने या ब्लॅक पँथरीची फासकीतून सुटका केली आणि  त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले. 

याबाबत वनविभाग राजापूर यांच्याकडुन मिळालेल्या माहितीनुसार. २६ जून २०२४ रोजी  मौजे- कुवेशी येथे हर्षद मांजरेकर यांच्या आंबा कलम बागेच्या कंपाऊंडला लावलेल्या तारेच्या फासकीत  काळा बिबट्या अडकला. याबाबत पद्मनाथ ऊर्फ पिंट्या कोठारकार यांनी परिमंडळ वनाधिकारी राजापूर यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. 

या काळ्या बिबट्याला  सुस्थितीत पिंजऱ्यात घेऊन पशू वैद्यकीय अधिकारी राजापूर  प्रभास किनरे आणि पशुधन विकास अधिकारी प्राजक्ता बारगे यांच्याकडून बिबट्याची तपासणी करुन घेतली. सदर काळा  बिबट्या सुस्थितीत असल्याची  खात्री करुन राजापूर वनविभागाने त्याला नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.

हा काळा बिबट्या नर जातीचा असून त्याचे वय सुमारे ५ ते ६ वर्ष असल्याचे वनविभागाने सांगितले. त्यानंतर  विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण)  गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल रत्नागिरी प्रकाश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याचे नैसर्गिक अदिवासात सोडण्यात आले. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे रत्नागिरी चिपळूण, वनक्षेत्रपाल प्रकाश सुतार, मानद वन्यजीव रक्षक निलेश बापट, वनपाल राजापूर  जयराम बावदाणे, वनपाल पाली न्हानू गावडे, वनरक्षक राजापूर विक्रम कुंभार, वनरक्षक रत्नागिरी प्रभू साबणे व रेस्क्यू टीमचे दीपक चव्हाण, विजय म्हादये, दीपक म्हादये, अनिकेत मोरे , महेश धोत्रे , नितेश गुरव, संतोष चव्हाण , निलेश म्हादये उपस्थित होते.अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६  किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे. 

Post a Comment

0 Comments