राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
गोखले हायस्कूल धाऊलवल्ली येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीचा उत्साह
राजापूर - राजापूर तालुक्यातील मौजे धाऊलवल्ली येथील गोखले हायस्कूलमध्ये आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची जयंती २६ जून २०२४ रोजी साजरी करण्यात आली. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला प्रशालेतील शिक्षक व विद्यार्थी-विद्यार्थिनी प्रतिनिधींनी दीप-धूप प्रज्वलन केले. प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीतील विद्यार्थिनी वरदा गोखले हिने केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान बालसभा सदस्य रिया जंगम हिने भूषविले तसेच आदिती सोगम, प्रज्ञा सौंदळकर, रिया जंगम, श्रावणी आपटे, एंजल शेगुलकर, स्वरा दळवी, अंतरा आंबेलकर या विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे केली. शिक्षक प्रतिनिधीतून संजीवनी हळदणकर यांनी भाषण केले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
0 Comments