Header Ads Widget

सागवे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी मर्याबी अ. रज्जाक बोरकर बिनबिरोध


उपसरपंचपदी मर्याबी अ. रज्जाक बोरकर बिनबिरोध

- संदीप शेमणकर

राजापूर  -  तालुक्यातील ग्रुपग्रामपंचायत सागवेच्या उपसरपंचपदाची निवडणूक पार पडली. उपसरपंचपदी महाविकास आघाडीच्या मर्याबी अ. रज्जाक बोरकर यांची निवड झाल्याचे महाविकास आघाडीच्या नेत्यानी जाहीर केले. 

सागवे ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवडणुकीत सचिव म्हणून ग्रामविकास अधिकारी एम. बी. नवरे तर अध्यासी अधिकारी सरपंच सोनाली ठुकरुल यांनी काम पाहिले. मंगेश गुरव यांच्या रिक्त झालेल्या पदी ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच सोनाली ठुकरुल, माजी सरपंच जुनेद मुल्ला, सदस्य कृष्णकांत मोंडे, माजी उपसरपंच तथा शिवसेना शाखाप्रमुख मंगेश गुरव, मसूद शेख, मधुकर जोशी, संदेश बोटले, अब्दुल रज्जाक अ. लतिफ बोरकर, अनुष्का राणे, नीलाक्षी येराम, योगिता नाकटे, रजिया बगदादी, परवीन बोरकर, साक्षी मांजरेकर, संपदा नार्वेकर आदी उपस्थित होते.

उपसरपंच श्रीम. बोरकर यांचे सरपंच सोनाली ठुकरुल, ग्रामविकास अधिकारी नवरे, सर्व सदस्य, ग्रामस्त यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments