विद्यार्थ्यांचा सत्कार, पालकांना मार्गदर्शन
रत्नागिरी - रत्नागिरी तालुका तेली समाजसेवा संघातर्फे आयोजित केलेल्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण व पदवीधर विद्यार्थी - पालकांसाठी मार्गदर्शनपर चर्चा सत्राला विद्यार्थी आणि पालकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
इयत्ता १० वी, १२ वीनंतर कुठे प्रवेश घ्यायचा? पदवीनंतर पुढं काय करायचं? स्वतःचा रोजगार करायचा की नोकरी ? यासाठी स्वतःला कसे ओळखावे ? यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे व योग्य मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी तालुका तेली समाजसेवा संघ रत्नागिरी यांच्याकडून रविवारी रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ संपर्क कार्यालय, डाॕ. पंकज बंदरकर यांचे घर, तेली आळी रत्नागिरी येथे या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाची सुरुवात करताना चर्चासत्राचे प्रमुख मार्गदर्शक डाॕ. आनंद आंबेकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी शशिकांत कोतवडेकर, जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार, कार्याध्यक्ष दीपक राऊत, जिल्हा सचिव संदीप पवार, जिल्हा खजिनदार दिनेश नाचणकर, शिवसेना शहरप्रमुख व मार्गदर्शक बिपीन बंदरकर, रत्नागिरी तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर, तालुका सहसचिव राकेश आंब्रे, तालुका खजिनदार प्रवीण पावसकर, शहर अध्यक्ष अमोल लांजेकर या मान्यवरांच्या हस्ते संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
कार्यक्रमाचा उद्देश प्रास्तविकामध्ये सचिन लांजेकर यांनी विषद केला. आय.टी.आय, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी महाविद्यालय यातील प्रवेश प्रक्रिया व त्यासाठी करावी लागणारी तयारी याविषयी सविस्तर मार्गदर्शन शशिकांत कोतवडेकर यांनी केले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
यावेळी प्रमुख वक्ते डाॕ. आनंद आंबेकर आपल्या ओघवत्या शैलीमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,आपण स्वतःला ओळखणे गरजेचे आहे. आपण जर स्वतःला ओळखले तरच आयुष्यात सिद्ध करु शकतो हे अनेक उदाहरणांसहित त्यांनी पटवून दिले. अशा प्रकारचे चर्चा सत्राचे आयोजन करून सचिन लांजेकर यांनी विद्यार्थी व पालकांसाठी एक चांगली संधी उपलब्ध करुन दिली म्हणून मी त्याला धन्यवाद देतो. मात्र अशा चर्चा सत्रात विद्यार्थ्यांच्या सोबत पालक पण तितकेच महत्त्वाचे आहेत,असे त्यांनी सांगितले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव व प्रतिक्रिया पाहता लवकरच सर्वांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करूया, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. यावेळी प्राध्यापिका मनस्वी सचिन लांजेकर, दिनेश नाचणकर, रघुवीर शेलार यांनी मनोगत व्यक्त केले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या कार्यालयाच्या ठिकाणी लवकरच प्राध्यापिका मनस्वी लांजेकर यांच्या माध्यमातून इंग्लिश स्पिकिंग कोर्स तसेच शशिकांत कोतवडेकर व दिनेश नाचणकर यांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा इत्यादी अभ्यासात्मक समाजातील विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील असे उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तरी इच्छुकांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
जाहिरात - अभिज्ञान अकादमी |
या चर्चासत्राला पालक म्हणून परशुराम (दादा) ढेकणे, श्रीधर अशोक दाभोळकर, बाळकृष्ण शेलार, अजय नाचणकर, शरद पावसकर, अमोल गोपाळ झगडे, सिद्धी राऊत यांच्या सोबत शहराच्या विविध भागातून विद्यार्थी सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तालुकाध्यक्ष सचिन लांजेकर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केले म्हणून सर्वानी त्यांचे विशेष कौतुक केले व यापुढे असे चांगले उपक्रम सातत्याने राबवावेत अशी विनंतीकरून जे लागेल ते सहकार्य आमच्याकडून करण्यात येईल असे उपस्थितांकडून सांगण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश नाचणकर यांनी केले.
0 Comments