लाल परी ७६ वर्षांची झाली : एसटीचा अवस्मरणीय प्रवास
एसटीचा ७६ वा वर्धापन दिन प्रत्येक बसस्थानकावर उत्साहात साजरा होणार
- संदीप शेमणकर
मुंबई- सर्वसामान्यांची लाल परी आता ७६ वर्षांची झाली आहे. १ जून, १९४८ ला पुणे-अहमदनगर मार्गावर एसटीची पहिली बस धावली. त्या निमित्ताने दरवर्षी १ जून हा एसटीचा वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. १ जून रोजी एसटीच्या सर्व बसस्थानकांवर प्रवासी आणि कर्मचारी बांधवांना साखर पेढे वाटून शुभेच्छा देण्यात येणार आहेत. वर्धापन दिनानिमित्त सर्व बसस्थानके रांगोळी काढून, फुलापानाची तोरणे बांधून सजविण्यात येणार आहेत.
होही वाचा https://abhidnyanlifeeducation.blogspot.com/2019/03/blog-post_13.html
गेली ७६ वर्ष राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासी दळणवळण सेवा देण्याचे प्रयत्न एसटी प्रामाणिकपणे करत आली आहे. आतादेखील ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता अनेक अडी-अडचणी, अडथळे, आर्थिक संकटावर मात करत राज्याच्या डोंगरदऱ्यातील वाडया वस्त्यांपासून आदिवासी पाड्यापर्यंत एसटी आपली प्रवासी दळणवळण सेवा देत आहे. त्यासाठी ८७ हजार कर्मचारी आणि अधिकारीवृंद रात्रंदिवस राबत आहेत. केवळ ३६ बेडफोर्ड बसेवर सुरू झालेला हा प्रवास ७६ वर्षांत १५ हजार बसेसपर्यंत पोहोचला आहे. या बसेस च्या माध्यमातून ५६० पेक्षा जास्त बस स्थानकावरून दररोज सरासरी ५५ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.
बेस्ट सवलत - https://amzn.to/3Km9Nx4
७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग, शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, पत्रकार अशा ३० पेक्षा जास्त समाज घटकांना एसटीच्या प्रवासी सेवेमध्ये ३३ टक्क्यांवरून १०० टक्क्यांपर्यंत शासनाद्वारे सवलत दिली जाते.
याबरोबरच गणेश उत्सव, दिवाळी, आषाढी, कार्तिर्की यात्रा अशा अनेक सण आणि उत्सवाच्या निमित्ताने नियमित फेऱ्यांबरोबरच विशेष फेऱ्या सोडून एसटी सर्वसामान्य प्रवाशांबरोबरच भाविक प्रवाशांची सोय करते. तसेच शालेय सहली, लग्न समारंभ, विविध शासकीय महोत्सव, मेळावे यासाठीदेखील एसटी आपली सेवा पुरवीत आहे.
भेट द्या - https://www.instagram.com/p/C7eT7V-IJrV/?igsh=MW4yYmt1dWU5cnd4OA==
चांदा ते बांधा धावली एसटी
गेली ७६ वर्ष प्रवाशांचे प्रेम आणि विश्वासार्हता या शिदोरीवर एसटी "महाराष्ट्राची लोकवाहिनी" बनली आहे. भविष्यातदेखील प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने एसटी कटिबद्ध राहील, अशी ग्वाही देत, लाखो प्रवाशांना एसटीच्या वतीने उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments