Header Ads Widget

शिंदे 'ही' जागा गमावणार, तर ठाकरेंच्या पारड्यात विजय, सट्टा बाजाराचा अंदाज


शिंदे 'ही' जागा गमावणार, तर ठाकरेंच्या पारड्यात विजय, सट्टा बाजाराचा अंदाज

मुंबई - सातव्या टप्प्यातील मतदान संपत असतानाच आज संध्याकाळी एक्झिट पोलचे आकडे समोर येणार आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची धाकधुक वाढली आहे. एक्झिट पोलनुसार २०२४ची लोकसभा निवडणूक कोण जिंकणार आणि कोण हरणार याचा अंदाज वर्तवण्यात येणार आहे. दरम्यान सत्ता कोणाची येणार याचा सट्टा बाजारानेही अंदाज वर्तवला आहे. 

सट्टा बाजाराचा अंदाज

यवतमाळ वाशिम मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार विजयी होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंची शिवसेना विरुद्ध उद्धव ठाकरेंची शिवसेना अशी थेट लढत आहे. या मतदारसंघातून विद्यमान खासदार भावना गवळी यांना उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र भावना गवळींच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध होता. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेने खासदार हेमंत पाटलांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. आता राजश्री पाटील यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेने संजय देशमुख यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे येथे शिंदे विरूद्ध ठाकरे लढत झाली. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलूनही शिंदेंना फटका बसणार, असा अंदाज सट्टा बाजाराने व्यक्त केला आहे. 

जाहिरात

महाराष्ट्रातील चुरशीच्या लढती, सट्टा बाजाराचा अंदाज काय?

1) नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे नितीन गडकरी हे जिंकतील

2) चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा विजय होईल

3) यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात संजय देशमुख विजयी होतील

4) अमरावतीची जागा काँग्रेस जिंकेल, त्यामुळे नवणीत राणांना फटका बसण्याचाअंदाज

5)  बारामती लोकसभा मतदारसंघातून पुन्हा सुप्रिया सुळे विजयी होतील

6) उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून पीयूष गोयल विजयी होतील

7) कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपती हे विजयी होतील


Post a Comment

0 Comments