शिव सहकार सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची बैठक
मुंबई - शिव सहकार सेनेच्या अध्यक्षा शिल्पा सरपोतदार यांच्या अध्यक्षतेखाली शिव सहकार सेनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य यांची बैठक गुरुवार शिवसेना भवन, दादर-मुंबई येथे पार पडली. या बैठकीत शिव सहकार सेनेच्या रत्नागिरी (उत्तर) जिल्ह्यातील आणि मुंबई शहरामधील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आणि त्यांना नियुक्तिपत्र देण्यात आली. त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीत शिव सहकर सेना महत्त्वाच्या भूमिकेत असेल, असे यावेळी अध्यक्ष शिल्पा पोतदार यांनी सांगितले. आपापल्या तालुक्यातील, विभागतील सर्व सोसायट्या, अर्बन बँक, यावर विशेष लक्ष देण्याचे सांगण्यात आले. यावेळी राज्य कार्यकारिणी उपस्थित होती.
0 Comments