संगमेश्वर बसस्थानकात चिखलाचे सामाज्य
- संदीप शेमणकर
संगमेश्वर - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर चिखलाचे साम्राज्य पसरले असून अवकाळीमुळे झालेल्या पावसात प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
चौपदरीकरणाचे काम करत असताना गटारांची दुरुस्ती न केल्याने तसेच मोठे खोदकाम केल्याने बसस्थानकात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. संगमेश्वर तालुक्यात अवकाळी पावसामुळे पडझड सुरू झाली असून रस्त्यावर चिखलाच्या साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहिल्याच पावसात संगमेश्वर बस स्थानकासमोर चिखल साचला आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर बसस्थानक असून ते महत्त्वाचे बस स्थानक आहे. मुंबई-गोवा आदी लांब पल्ल्याच्या गाड्या या बस स्थानकातून सुटतात. लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी प्रवासी या ठिकाणी येत असतात. त्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.
0 Comments