आंबेडकर चळवळीतील राजाराम कदम गुरुजींचे निधन
देवरुख - संगमेश्वर तालुक्यातील आंबेडकर चळवळीतील देवरुख आंबेडकरनगरमधील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजाराम रावजी कदम ऊर्फ आप्पा यांचे बुधवारी, २२ मे रोजी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. बुधवारी सकाळपासून त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना साडवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत माळवली.
राजाराम कदम गुरुजींना तालुक्यात आप्पा म्हणून ओळखत होते. शिक्षकी पेशामध्ये असताना त्यांनी अनेक गुणवंत विद्यार्थी घडविले आहेत. सुमारे ३५ वर्ष ते शिक्षकी पेशात कार्यरत होते. उच्च श्रेणी मुख्याध्यापक म्हणून ते निवृत्त झाले होते. समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता. देवरुख विभागाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले होते. देवरुख स्मारक समिती, पुतळा समितीमध्ये ते अनेक वर्षे कार्यरत होते. त्यांच्या जाण्याने देवरुख विभागाचा एक भक्कम आधार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.
0 Comments