Header Ads Widget

वीर सोलंकी याचा सत्कार


यशवंत खोपकरांकडून वीर सोलंकीचा सत्कार 

मुंबई - शिवसेना वार्ड क्रमांक १२४ तर्फे वीर सोलंकी याने आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केल्याबद्दल ग्राहक संरक्षणच्या वतीने सत्कार करण्यात आला

मुंबईतील इंटरनॅशनल इडो-यू कराटे डो फेडरेशन या अकादमीतील वीर गिरीश सोलंकीने यूएई दुबई येथे आयोजित द इंटरनॅशनल कराटे चॅम्पियनशिप दुबई बुडोकर कप- २०२४ या स्पर्धेत रौप्य आणि सुवर्ण पदक जिंकण्याची चमकदार कामगिरी केली. दुबईच्या संयुक्त अरब अमिराती येथील केंट कॉलेज स्पोर्ट हॉल येथे या स्पर्धा पार पडल्या. जगातील १६ देशातील भारत युएई. कझाकस्तान, चीन, जपान, फिलिपिन्स, ओमान,कुवेत, सौदी, अरेबिया, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका, इंडोनेशिया,भुतान, यू के आणि ऑस्ट्रेलिया अशा देशातून एकूण -८२८ खेळाडूंनी सहभाग घेतला या आंतरराष्ट्रीय कराटे बुडोकन स्पर्धेत वीर सोलंकीने यांनी कामगिरी केली आणि सुवर्ण पदक त्याने पटकावले. 

https://rewardy.io/?ref=prasadsghanekar

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड क्रमांक-१२४ तसेच मायेची सावली एक हात कर्तव्याचा संस्थापक अध्यक्ष  यशवंत विठ्ठल खोपकर यांच्या वतीने वीर सोलंकी याचे पुष्पगुच्छ देऊन व शॉल शिफल देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेचा वतीने सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ग्राहक संरक्षण कक्ष वार्ड संघटक १२३- राजेंद्र पेडणेकर, उपशाखप्रमुख महादेव करळकर, उपशाखाप्रमुख विजय शिरोडकर, विनायक जाधव, विलास जाधव, शाहीन शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments