Header Ads Widget

शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक 26 जूनला


शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक 26 जूनला

 १ जुलैला मतमोजणी, निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

- संदीप शेमणकर

मुंबई - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीदरम्यान जाहीर करण्यात आलेल्या विधान परिषद निवडणुकांची नवी तारीख जाहीर करण्यात आलीय आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी २६ जूनला मतदान होणार आहे, तर १ जुलै रोजी मतमोजणी केली जाणार आहे. शिक्षक निवडणूक ड्युटीवर असल्याचे कारण देत विधान परिषद निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर आणि मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक १० जून होणार असल्याचं जाहीर करण्यात आली होती. शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी, शिक्षक निवडणूक ड्यूटीवर असल्याने ही निवडणूक पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. त्यानुसार निवडणूक आयोगाने नवीन वेळापत्रक जाहीर केले आहे. ७ जूनपर्यंत निवडणुकीसाठी इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. १० जूनपर्यंत अर्ज छाननी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. तर १२ जूनला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहेत. २६ जून रोजी चारही मतदारसंघांत  निवडणूक होणार आहे. सकाळी ८ ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे.

Post a Comment

0 Comments