Header Ads Widget

यश चव्हाणचा आमदार राजन साळवींच्या हस्ते सत्कार


यश चव्हाणचा आमदार राजन साळवींच्या हस्ते सत्कार

केशभूषा स्पर्धेत भारतातून सुवर्ण पदक विजेते लांज्याचे सुपुत्र यश चव्हाण याचा सत्कार

लांजा - दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धा (इंडिया स्किल २०२४)  या भारतातील सर्वात मोठ्या कौशल्य स्पर्धेमध्ये यश दिनेश चव्हाण याला 'केशभूषा' या कौशल्यामध्ये संपूर्ण भारतातून सुवर्णपदक मिळवल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी सन्मान केला.

लांजा तालुक्याचा सुपुत्र यश दिनेश चव्हाण हा वयाच्या १२ व्या वर्षापासूनच त्याने वडिलांच्या सलूनमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अगदी कमी वयातच यशने केशभूषेमधील  विविध कौशल्य आत्मसात केली. दहावी झाल्यानंतर यशने मुंबई गाठली आणि उदय टक्के अकॅडमीमध्ये ऍडमिशन घेऊन दोन वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. उदय टक्के सरांच्या मार्गदर्शनाखाली यश पहिल्यांदा २०२१ मध्ये राष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये (इंडिया स्किल २०२१) सहभागी झाला. इंडिया स्किल ही खेळाडूंमधील कौशल्य दाखवणारी भारतातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. यामध्ये एकूण ७५ कौशल्यांचा समावेश आहे. २०२१ मध्ये पार पडलेल्या इंडिया स्किल स्पर्धेमध्ये यशने महाराष्ट्रामधून सुवर्णपदक तसेच प्रादेशिक स्तरावर (रिजनल लेव्हल) रौप्य पदक पटकावले होते. राष्ट्रीय स्तरावर मेडालियन ऑफ एक्सेलन्स (Medallion of excellence) हे पदक मिळाले होते. त्यानंतर दोन वर्ष अपार मेहनत घेऊन, नियमितपणे प्रॅक्टिस करून पुन्हा एकदा उदय टक्के सरांच्या मार्गदर्शनाखाली २०२३-२४ च्या इंडिया स्किल कॉम्पिटिशनमध्ये यश सहभागी झाला. यामध्ये महाराष्ट्रातून सुवर्णपदक प्राप्त करून,  संपूर्ण भारतामध्ये सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे. 

फ्रान्स येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास स्पर्धेमध्ये भारताचे नेतृत्व करण्यासाठी यश सज्ज होत आहे. त्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी यशचा सन्मान केला.

Post a Comment

0 Comments