Header Ads Widget

नालेसफाई अन् निष्काळजीपणा, शिवसेनेचा मनपा प्रशासनाला इशारा


नालेसफाई अन् निष्काळजीपणा,  शिवसेनेचा मनपा प्रशासनाला इशारा

मान्सूनपूर्व उपाययोजनांवरून इशारा

वसई - वसई विरार महापालिका प्रशासनाच्या कामचुकारपणामुळे नालासोपारा शहरातील प्रमुख नाले या वर्षी साफ न झाल्याने शहर तुंबण्याची शक्यता आहे; तर या नालेसफाईत हातसफाई करणाऱ्या प्रभाग समितीच्या संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना महिला शहरप्रमुख रुचिता नाईक यांनी केली आहे. 

नालासोपारा शहरातील प्रमुख नाले अद्यापही साफ केलेले नाहीत. बहुतांश नाल्यांतील गाळ तसाच असल्याचे दिसत आहे. एकीकडे पालिका आयुक्त शंभर टक्के नालेसफाईचा आग्रह धरत असताना नालासोपारातील नालेसफाईत दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी रुचिता नाईक यांनी केली आहे. साफ न केलेल्या नाल्यांमध्ये समेळगाव, साईनगर, छेडानगर, हनुमाननगर या नाल्यांचा समावेश असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.

नाल्यांची सफाई न झाल्याने आगामी काळात अनेक  घरांमध्ये पाणी शिरण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.तातडीने नालेसफाई करण्याची मागणी रुचिता नाईक यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments