माजी विद्यार्थी रमले स्नेहसंमेलनात
एस. व्ही. एस. व्ही माणगाव स्कूलच्या
माजी विद्यार्थ्यांचे स्नेसंमेलन उत्साहात
कुडाळ - एस.व्ही.एस.व्ही. माणगाव स्कूल शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन शनिवार दिनाक ४ मे २०२४ रोजी.माणगाव शिवसृष्टी फार्म मुळढे कुडाळ येथे उत्साहात पार पडले. या संमेलनानिमित्त मोठ्या प्रमाणावर माजी विद्यार्थी जमले होते
'माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो स्नेहसंमेलन हा अविस्मरणीय क्षण आहे. अजूनही तो दिवस तरी विसरू शकलो नाही. त्या दिवशी झालेल्या गमतीजमती व अनुभव फार सुखकारक होते. सर्व मित्र मैत्रिणींनी एक दिवस दैनंदिन जीवन विसरून एकरुप झालो', अशा भावना माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
हा आनंदाचा क्षण आम्ही आमच्या आयुष्यात सदैव जपून ठेवू . या सोहळ्यात सहभागी झालेल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीचे मन:पूर्वक आभार. त्याचबरोबर दाजी बागवेसाठी केलेले योगदान खूप मोलाचे आहे. अशीच आपली मैत्री अखंडित राहो, ही ईश्वरचरणी प्रार्थना अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. स्नेहसंमेलन या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणीना उजाळा दिला.
प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चयही माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.
0 Comments