गोव्याकिनारी...बरसणार सरी
रत्नागिरी - गोव्यामध्ये यंदा मान्सून लवकर हजेरी लावणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गोव्यात 22 मेपर्यंत मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. एकीकडे राज्यभरात उन्हाची तीव्रता वाढली आहे. नागरिकांच्या अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. तर गोव्यातील वातावरण दमट राहण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. गोव्यात 16 ते 20 मे दरम्यान ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे समुद्रात मच्छीमारांनी जाताना काळजी घ्यावी, असंही आवाहन हवामान खात्यातर्फे करण्यात आले आहे.
0 Comments