Header Ads Widget

रोटरी क्लब : अपंगांना बसविले पाय


रोटरी क्लब रत्नागिरीतर्फे जयपूर फूट कॅम्पमध्ये अपंगांना बसविले पाय

रत्नागिरी - रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी आणि रोटरी लोककल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने जयपूर फूट फिटिंग कॅम्प हा १७ मे रोजी मराठा भवनमध्ये आयोजित करण्यात आला  होता . एकूण १२ लाभार्थींनी या कॅम्पमध्ये सहभागी झाले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून रत्नागिरी टाइम्सच्या मालक, मंगलमूर्ती प्रतिष्टानच्या अध्यक्षा तसेच राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकर उपस्थित होत्या. त्यांनी रोटरीच्या कामाचे कौतुक केले. 

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रोजेक्ट चेअरमन म्हणून रोटे वेदा मुकादम आणि टीम यांनी प्रचंड मेहनत घेतली. कार्यक्रमाला रोटरी अध्यक्ष श्रीकांत भुर्के, सचिव प्रमोद कुलकर्णी तसेच धरमसी काका चौहान, विनायक हातखंबकर, दिलीप भाटकर, कीर्तिकुमार पटेल, अंजली इंदुलकर, रुपेश पेडणेकर, ऋता पंडित, परेश साळवी, सचिन शिंदे, नीता शिंदे, निलेश मुळे,  देवयानी वाघधरे, माधुरी कळंबटे, मुग्धा कुळये, मंदार सावंतदेसाई, विश्वजित कोतवडेकर, स्वप्नील साळवी, रोहित वीरकर, मकरंद भुर्के,  सान्वी भुर्के,  अपूर्वा काळोखे, पूजा कुलकर्णी  उपस्थित होते . कार्यक्रमाला व्हीलचेअर सेवा  डॉ. मनीषा भागवत यांनी पुरवली.

Post a Comment

0 Comments