कोकणातील पोरं हुश्शार
आडिवरे हायस्कूलचा निकाल 95.91 तर कशेळीचा निकाल 100 टक्के
Maharashtra Board Results 2024 Declared: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. बारावीच्या परीक्षेसाठी राज्यभरातून १५, २०, १८१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १५,०९, ८४८ विद्याथी परीक्षेला उपस्थित होते. यातील १३, ८७,१२५ विद्यार्थी यंदा उत्तीर्ण झाले आहेत. यंदा बारावीचा निकाल ९३. ३७ टक्के लागला आहे. यंदाही निकालात कोकण विभागानं बाजी मारली आहे.
बारावीची परीक्षा ही तब्बल ९ विभागांमध्ये झाली होती.मागील वर्षी सुद्धा कमी अधिक प्रमाणात याचपद्धतीने विभागांची उत्तीर्णतेची टक्केवारी होती. यंदा सुद्धा कोकण विभागला आपला पहिला क्रमांक राखून ठेवण्यात यश आलं आहे. तर मुंबई विभागाला अजूनही शेवटच्या स्थानावरून पुढे जाता आलेले नाही.९७.५१ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर ९१.९५ टक्क्यांसह मुंबई विभाग सर्वात तळाशी आहे.
राजापूर तालुक्याचा निकाल ९८.११ टक्के लागला. तालुक्यातील आयटीआय सह १८ कनिष्ठ महाविद्यालयातून १३८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १३५५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण ९५ विद्यार्थ्यांनी विशेष श्रेणी प्राप्त केली आहे. ३८२ विद्यार्थी प्रथमश्रेणीत, ६९१ द्वितीय श्रेणीत तर १८७ विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. तालुक्यातील दहा कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
राजापूर तालुक्यातून शंभर टक्के निकाल देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयात विसी गुर्जर विद्यामंदिर आणि कनिष्ठ महाविद्यालय कशेळी, ज्ञानप्रबोधिनी दत्तवाडी कनिष्ठ महाविद्यालय, साने गुरुजी विद्यामंदिर आणि पी. बी. चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय जानशी, नाटेश्वर विद्यामंदिर नाटे, इंद्रनिल तावडे कनिष्ठ महाविद्यालय कोंड्ये, माध्यमिक विद्यामंदिर मुर, बाल साठे उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय देवाचे गोठणे, नॅशनल इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय राजापूर, शासकीय तंत्रनिकेतन हर्डी, रा. ब. उमाकांत श्रीरंग देसाई विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कुंभवडे यांचा सामावेश आहे तर चांगला निकाल देणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये राजापूर हायस्कूल व गोडेदाते कनिष्ठ महाविद्यालय राजापूर ९६.६८ टक्के, सरस्वती विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल ९९.६१ टक्के, न्यू इंग्लिश स्कूल व एस. आर. मांजरेकर कनिष्ठ महाविद्यालय जैतापूर ९५ टक्के, आदर्श विद्यामंदिर वाटुळ ९७.१४ टक्के, नूतन विद्यामंदिर ओणी ९२.८५ टक्के, नवजीवन हायस्कूल राजापूर ९९.६१ टक्के, श्री महाकाली इंग्लिश स्कूल नवेदर आडिवरे ९५.९१ टक्के, सागवे कनिष्ठ महाविद्यालय ९६ टक्के, पाचल विद्यालय ९९ .६१ टक्के असा निकाल लागला आहे. दरवर्षी चांगला निकाल देण्याची परंपरा राजापूर तालुक्याने या वर्षी देखील कायम राखली आहे.
आडिवरे टाइम्सतर्फे सर्व विद्यार्थी आणि त्यांना घडवणाऱ्या शाळांचे अभिनंदन
source-www.loksatta.com
0 Comments