Header Ads Widget

sanam raja raghuvanshi murder : हनी, हनिमून आणि हत्या, सनम 'बेवफा'ने रचला कट


हनी, हनिमून आणि हत्या... अंगावर काटा उभा करणारं थंड डोक्यानं आखलेलं षडयंत्र...एक सुनियोजित कटासाठी सुनियोजित हनिमून...सोन्याचे दागदागिने आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार...नात्यांमध्ये लपलेला हत्येचा भयंकर कट...राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम रघुवंशीमध्ये नेमकं काय घडलं...हा हनिमून होता की क्रूर हत्येचं षडयंत्र...काय आहे ही थरारक कहाणी, चला जाणून घेऊयात राजा रघवंशी हत्येमागेचं राज...

पत्नी सोनम रघवंशीच बेवफा सनम ठरली. प्रेमामध्ये अडथळा ठरणाऱ्या पती राज रघुवशींची प्रियकराच्या मदतीने थंड डोक्याने काटा काढण्याची योजना तिनं आखली. 20 मे 2025 रोजी इंदूरमध्ये राजा रघुवंशी आणि सोनम रघुवंशी यांचा विवाह थाटामाटात पार पडला. लग्नानंतर हे नवविवाहित जोडपं हनिमूनसाठी मेघालयात गेलं. राजा रघुवंशी हनिमूनची स्वप्न रंगवत होता तर सोनम त्याचा काटा काढण्याच्या विचारात होती. ते दोघेही शिलाँगजवळील चेरापुंजीतील नोंग्रीट गावात डबलडेकर लिव्हिंग रूट ब्रिज पाहण्यासाठी गेले. मात्र राजा रघुवंशी याला स्वप्नातही वाटलं नव्हतं हा त्याचा शेवट असेल. नवऱ्याबरोबर हसतखेळत असलेली सोनमने हनिमून नव्हे तर नवऱ्याच्या हत्येसाठा भयंकर योजना आखली होती.

शिलाँग पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम रघुवंशी आणि तिचा प्रियकर राज कुशवाहा यांनी मिळून राजा रघुवंशीच्या हत्येचं षडयंत्र रचलं. राज कुशवाहा शिलाँगमध्ये नव्हता. मात्र फोनवरून तो कॉन्ट्रॅक्ट किलर्सच्या संपर्कात होता. राजाला संपवण्यासाठी त्यांनी तीन कॉन्ट्रॅक्ट किलर्सची मदत घेतली होती. आकाश, विशाल आणि आनंद हे तिन्ही कॉन्ट्रॅक्ट किलर्स चेरापुंजीत दाखल झाले. सोनमने जाणीवपूर्वक राजाला एका सूमसाम रस्त्यावर नेलं. तिथे या तिघांनी मिळून राजा रघुवंशीवर हल्ला केला आणि त्याची निर्घृण हत्या केली. राजाचा काटा काढला. हत्येनंतर सोनम आणि हे तिन्ही किलर्स शिलाँगहून गुवाहाटीला पळाले. एक दिवस त्यांनी गुवाहाटीलाच काढला. त्यानंतर सर्व जण वेगवेगळ्या मार्गाने पसार झाले.

मात्र सोनम जिवंत असल्याची आणि राजा रघुवंशीच्या कटात तिचा हात असल्याची पोलिसांना शंका आली. सोनमच्या फोन कॉल डिटेल्समधून धक्कादायक खुलासा समोर आला. ती राज कुशवाहाशी सतत संपर्कात होती. दोघांचे प्रेमसंबंध होतं आणि राजा रघुवंशी हा त्यांच्या मार्गातला अडथळा होता. पोलिसांनी  सीसीटीव्ही फुटेज पाहिलं आणि सनम बेवफा असलेल्या सनम आणि तिचा प्रियकर राज कुशावाह यांनी आखलेल्या हत्येचा पर्दाफाश केला. हत्येच्या 17 दिवसांनंतर, 2 जून 2025 रोजी राजा रघुवंशीचा मृतदेह शिलाँगजवळ सापडला, मात्र बेवफा सोनम फरार होती.

पोलीस गप्प बसलेले नव्हते. त्यांनी तपासाची चक्रं फिरवून सर्वात आधी ललितपूर येथून आकाश राजपूतला बेड्या ठोकल्या. त्यानंतर इंदूरमधून विशाल आणि राज कुशवाहाला पकडलं. सोनम रघुवंशीने गाझीपूर येथील एका ढाब्यावर आत्मसमर्पण केलं. तर पाचवा आरोपी आनंदलाही अटक करण्यात आली. राजा रघुवंशी हत्याकांडात एकूण पाच जणांच्या मुसक्या आवळ्यात पोलिसांना यश आलंय.  

आपलीच हनी, आपलाच हनिमून आणि आपलीच हत्या होईल असं राजा रघुवंशीच्या स्वप्नातही आलं नसेल. हनिमूनसारख्या सुंदर स्वप्नाचा असा भयंकर अंत होईल, असंही कुणाला वाटलं नव्हतं. सोनम रघुवंशी, राज कुशवाहा आणि कॉन्ट्रॅक्ट किलर्स यांनी मिळून रचलेला हा भयंकर कट देशभरात चर्चेचा विषय ठरलाय. आता न्यायाची वाट पाहणाऱ्या राजा रघुवंशीच्या कुटुंबाला खरंच न्याय मिळेल का आणि प्रियकरासाठी बेवफा बनलेली सनमला शिक्षा होईल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अंगावर काटा आणणारी  थरारक कहाणी अजून संपलेली नाही. जर सनमचं राज कुशवाहावर एवढं प्रेम होतं तर निष्पाप राजा रघुवंशीचा जीव घ्यायची गरज नव्हती. राजा रघुवंशीला लग्नापूर्वीच कल्पना दिली असती तर एक जीव वाचला असता आणि थरारक हत्याकांड घडलं नसतं. 


Post a Comment

0 Comments