धकधक गर्ल माधुरी दीक्षित नेने हिला दोन मुलं आहेत. तिच्या मोठ्या मुलाचं नाव अरिन आहे तर धाकट्या मुलाचं नाव रायन. यापैकी मोठा मुलगा अरिन याने शिक्षणामध्ये यश मिळवलंय. त्याचं एक स्वप्न पूर्ण केलंय.
अरिन नुकताच अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून पदवीधर झालाय. त्याने दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील ‘विटेर्बी स्कूल ऑफ इंजिनिअरिंग’मधून कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवी मिळवलीय. अरिननं सॉफ्टवेअर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स,तंत्रज्ञानासोबतच व्यवस्थापना डिग्री घेतलीय. आपल्या मुलाच्या यशाने आई माधुरी दीक्षित आणि वडील श्रीराम नेने यांना आनंद झालाय आणि अभिमानही वाटतोय. माधुरीने अरिनचा पदवीप्राप्तीचा फोटो शेअर केलाय. आम्हाला तुझा अभिमान आहे. तू स्वतःचं स्वप्न पूर्ण केलंस आणि आम्ही तुझ्यापाठीशी आहोत.’ या शब्दांमधून एका आईचा आनंद आणि समाधान व्यक्त केलंय.
अरिन लहानपणापासूनच अभ्यासू, पण शांत स्वभावाचा. अभिनय किंवा झगमगाटीच्या दुनियेत न शिरता त्याने स्वतःचं करिअर विज्ञान आणि तंत्रज्ञानात घडवण्याचा निर्णय घेतला. यासाठी माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने यांनी अरिनवर कोणताही दबाव आणला नव्हता. उलट मोकळं वातावरण ठेवून त्याच्या आवडीला महत्त्व दिलं. पदवीदान समारंभात अरिनचा आत्मविश्वास, आनंद आणि संयम जाणवत होता. आज तो केवळ माधुरीचा मुलगा म्हणून नाही, तर स्वतःच्या मेहनतीने आपली ओळख बनवणारा तरुण आहे. त्याच्या यशामागे केवळ IQ नव्हे, तर पालकांचा विश्वास, योग्य मार्गदर्शन आणि स्वप्नांवरची निष्ठा आहे. या यशामागे कुठेही कोणताही सेलिब्रिटी टॅग वापरलेला नाही. अरिन नेनेने आपली वाट स्वतः तयार केली आहे. आज तो नव्या पिढीसाठी एक रोल मॉडेल ठरतोय. त्याने ग्लॅमरच्या झगमगाटापेक्षा ज्ञान आणि कर्तृत्वावर भर दिलाय.
धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या मुलाने स्वत:ची ओळख निर्माण केलीय. अरिनला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!
.png)
0 Comments